Google Ad
Uncategorized

आता प्रत्येक गुरुवारी नारायणपुरची श्रीदत्त वारी..! दर गुरुवारी आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर पी.एम.पी.एम.एल. बस सेवा सुरु…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ जानेवारी) : मागील अनेक वर्षांपासून सांगवी ते श्री क्षेत्र नारायणपूर बंद असलेली एसटी बस सेवा बंद आहे. परंतु सांगवी, नवी सांगवी पिंपळे गुरव’च्या नागरिकांच्या मागणीनुसार गुरुवार (दि.१ फेब्रुवारी) पासून पी एम पी एल मार्फत भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप याच्या पाठपुराव्याने पिंगळे गुरव ते नारायणपूर ही बस सेवा दत्त भक्तांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली. या बस सेवेमुळेपिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना नारायणपूर येथील श्री एकमुखी दत्त महाराजांच्या मंदिरात ये-जा करता येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे या मार्गावरील एसटी बससेवा बंद करण्यात झाली होती. ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी शंकर जगताप यांच्याकडे भाविकांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार पी एम पी एम एल प्रमुख यांनी भाविकांची मागणी विचारात घेऊन एसटी बस सुरू केली. दरम्यान शहरातील भाविक भक्त व प्रवासी, जेष्ठ नागरिक व युवकांनी पी एम पी एम एलनेच सुरक्षित व उत्तम सेवेचा लाभ घेत प्रवास करावा, असे आवाहन शंकर जगताप यांच्या वतीने करण्यात आले. दर गुरुवारी आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर पी.एम.पी.एम.एल. बस सेवा सुरु असणार आहे.

Google Ad

▶️वेळापत्रक :-

पिंपळे गुरव

सकाळी – ७:०० वा.

दुपारी – २:०० वा.

श्री क्षेत्र नारायणपूर

सकाळी – १०:१५ वा.

सायंकाळी – ५:३५ वा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!