Categories: Uncategorized

” उत्तुंग यशाची परंपरा” … ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल’ नवी सांगवीचा पुन्हा एकदा आठव्यांदा यशाची परंपरा राखत दणदणीत ९९.१९ टक्के निकाल

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.०२ जून ) : ” उत्तुंग यशाची परंपरा” प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल, नवी सांगवीचा पुन्हा एकदा आठव्यांदा यशाची परंपरा राखत दणदणीत ९९.१९ टक्के निकाल लागला. यामध्ये पाचपुते श्रेया जितेंद्र ९६.२०% (प्रथम), देसाई रोशनी सुरेश ९४.८०% (द्वितीय क्रमांक), कोलते वेदांत आशुतोष ९३% (तृतीय क्रमांक) उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.१९% मिळवून दणदणीत यशाचे मानकरी ठरले.

१२४ मुलांपैकी ४९ मुलांनी डिस्टिंक्शन मिळवून ३९ मुले फर्स्ट क्लास मध्ये पास झाली. हे सर्व त्यांच्या कष्टाचे फळ,शिक्षकांचे मार्गदर्शन ,शाळेचे नियम, याचे फलित होय.याप्रसंगी पाचपुते श्रेया जितेंद्र हिने आपल्या शाळेला व शाळेतील शिक्षकांना यशाचे श्रेय दिले. तर देसाई रोशनी सुरेश हिने आपल्या यशाचे रहस्य उलगडताना दररोजचा अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन, व शाळेची शिस्त, यामुळे वेळोवेळी अभ्यासास संधी मिळाली. तर कोलते वेदांत आशुतोष यांने पालक, शाळा, शिक्षक, व शाळेची शिस्त या सर्वांमुळे मी यश मिळवू शकलो असे सांगितले.

‘दहावीच्या परीक्षेतील यशानंतर करिअर निवडीसाठी विविध मार्ग दिसू लागतात. या मार्गावरून पुढे जाण्यासाठी, आवडते क्षेत्र निवडण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये संस्थेचे सचिव मा. शंकर जगताप यांनी दहावीच्या परीक्षेतील यशवंत, गुणवंतांचे अभिनंदन करून भावी आयुष्यच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सोबत पालकांचे तोंड भरून कौतुक केले .

तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विजूअण्णा जगताप ,सदस्या स्वाती पवार , श्री देवराम पिंजन व सर्व संचालक मंडळ , प्राचार्यां इनायत मुजावर मॅडम यांनीही यशस्वी विध्यार्थीचे तोंड भरून अभिनंदन कौतुक केले. त्याचबरोबर त्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या सर्व शिक्षक स्टाफ, शिक्षकेतर वर्ग , यांचेही प्राचार्या इनायत मुजावरमॅडम यांनी कौतुक केले .

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के एवढा लागल आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे.

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करा अर्ज

दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यास विषयाची गुण पडताळणी करणे, उत्तरपत्रिकांची छायाप्रत मागवून पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन माध्यमातून स्वत:, शाळांमार्फत http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर पुढील पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. गुण पडताळणीसाठी दि. ३ ते १२ जून तसेच छायाप्रत मागविण्यासाठी दि. ३ ते २२ जूनपर्यंत या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. डेबीट, क्रेडिट कार्ड तसेच यूपीआय आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क भरता येणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago