Google Ad
Uncategorized

प्रभाग क्रमांक २३ थेरगाव मधील रेंगाळत चाललेल्या कामांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ‘प्रशांत सपकाळ’ यांनी घेतली दखल … आयुक्तांना दिला इशारा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ यांनी प्रभाग क्रमांक 23 थेरगाव येथे गेल्या आठ महिन्यापासून संथ गतीने जी काही रस्त्यांची व इतर खोदकामाची कामे सुरू आहेत ती लवकर करण्यात यावी सदरील दिरंगाईमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झालेले असून लवकरात लवकर कामे पूर्णत्वास न्यावे त्यासंदर्भात चे निवेदन आयुक्त राजेश पाटील यांना दिले.

या प्रसंगी बोलताना प्रशांत सपकाळ म्हणाले की,” विकास कामांना आमचा विरोध नाही पावसाळ्यामध्ये परिसरातील नागरिकांनी हाल सहन केले, पण आता निदान सणासुदीच्या तोंडावर तरी हा त्रास नकोय! येत्या पंधरा दिवसात ही कामे करून घ्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ही दिला.

Google Ad

या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सरचिटणीस अभिजीत आल्हाट सामाजिक कार्यकर्ते दीपक तरडे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शिंदे सामाजिक न्याय विभागाचे अमित गायकवाड व कल्पना आल्हाट, खंडू डावरे इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!