महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ सप्टेंबर) : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” म्हणत आपल्या लाडक्या गणपती बाप्पा ला सातव्या दिवशी नवी सांगवी, सांगवीकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. डी जे चा ठेका, ढोल- ताशा वाद्य पथकांचे वादन, ‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजातील भिंती तर दुसरीकडे ‘विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल भजनाचा नाद …
नवी सांगवीतील फेमस चौक गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत असल्याचे चित्र गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत होता. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत होते. शिव प्रतिष्ठाण च्या वतीनेही गणेश मंडळांचा सत्कार करण्यात येत होता.
सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. नवी सांगवीतील समर्थ नगर मित्र मंडळ, वाघजाई मित्र मंडळ, कृष्णा चौक मित्र मंडळ, अभिनव मित्र मंडळ, भारत मित्र मंडळ, स्वामी विवेकानंद नगर मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, क्रांती चौक मित्र मंडळ, नवी सांगवी विभागीय मित्र मंडळ, सत्ता प्रतिष्ठान, समता नगर मित्र मंडळ, गणेश नगर मित्र मंडळ, स्वराज मित्र मंडळ, विनायक नगर मित्र मंडळ , भारत माता मित्र मंडळ, विद्या नगर मित्र मंडळ, चैत्रबन मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, बारामती मित्र मंडळ, महाराष्ट्र मित्र मंडळ या नवी सांगवी – पिंपळे गुरव परिसरातील मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
जुनी सांगवीतील ढोरे नगर मित्र मंडळाने यावर्षी ज्ञानदेवांचे योग सामर्थ्य हा हलता देखावा साकारला होता. आकर्षक रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बालाजी प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शंकर महादेवाच्या आकर्षक साधना मूर्ती असलेल्या सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रणझुंजार मित्र मंडळ, समर्थ मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, मुळा नगर तरुण मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, शिवशक्ती व्यायाम मंडळ, गंगानगर मित्रमंडळ, ममता नगर मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ शितोळे नगर, जिज्ञासा सोशल वेल्फेअर ट्रस्ट, शितोळे नगर मित्र मंडळाच्यावतीने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आनंद नगर मित्र मंडळाच्यावतीने यावर्षी ‘चंद्रयान ३’ हा हलता देखावा सादर केला होता. याचीच विसर्जन मिरवणुकीत केलेली लक्षवेधी सजावट लक्ष वेधून घेत होती. पहिल्यांदाच सीझन सोशल ग्रुप प्रशांत शितोळे मित्र परिवाराच्यावतीने सकाळी मिरवणूक काढण्यात आली. इतर वाद्यांना बगल देत विविध ठिकाणांहून आलेल्या भजनी मंडळी वारकऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. भगव्या पताका, रामकृष्ण हरी, विठ्ठल नामाच्या जयघोषात सांगवीच्या राजाची, मिरवणूक काढण्यात आली. सकाळी राहीमाई प्रतिष्ठान संयुक्त शिव मित्र मंडळाच्यावतीने ढोल ताशा पथकाच्या वादनाने मिरवणूक काढण्यात आली.
रात्री ठीक १२ वाजता सर्व वाद्य पथक व डी जे बंद करण्यात आले आणि सर्व गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे अहिल्यादेवी घाटावर विसर्जन केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…