Google Ad
Uncategorized

अंत्य संस्कारासाठी मुस्लिम, सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? नवाब मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा घणाघात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ नोव्हेंबर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील हल्लाबोल सुरुच आहे. “आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असं ट्वीट करत मलिक यांनी ट्विटरवरुन काही कागदपत्रं शेअर केली आहेत.

महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी शेअर केली आहेत.

Google Ad

मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं.

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक सातत्याने करत आहेत. त्यासंदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम धर्मगुरुंच्या समोर सही करताना दिसत होते.

समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!