Google Ad
Uncategorized

आयआयएमएस संस्थेला जिल्हास्तरीय स्वच्छ भारत अभियान पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर २०२१) : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  चिंचवड  येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) संस्थेला  केंद्र सरकारच्या  युवा कार्यक्रम  व क्रीडा  मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र,पुणे यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियान २०२१-२०२२ चा जिल्हा स्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शिवाजीनगर पुणे येथील पंडित  जवाहरलाल नेहरू  सांस्कृतिक  भवनात  संविधान दिनानिमित्त   आयोजित कार्यक्रमात  हा पुरस्कार प्रदान करण्यात  आला.

जनमानसात स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी आयआयएमएस ने विद्यार्थ्यांच्या सहभागाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीची दखल घेत  संस्थेची या पुरस्कारासाठी  निवड करण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे संचालक प्रकाश कुमार मनुरेजी व नेहरू युवा केंद्र पुणेचे उप संचालक यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला.

Google Ad

यावेळी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) संस्थेच्या वतीने संस्थेचे पदाधिकारी  पवन शर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी कार्यक्रमाला आयकर विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडे,पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे उपायुक्त आण्णा बोदडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!