Editor Choice

खासदार शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला पिंपरी चिंचवडचा आढावा … गरजू लोकांच्या उपचारासाठी महानगरपालिकेला दिली ५० रेमडेसेवर इंजेक्शन!

महाराष्ट्र 14 न्यूज, ०३ सप्टेंबर : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेटी दरम्यान महानगरपालिकेने कोरोना बाधित रुग्णांना तातडीने बेड्स उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केलेल्या विविध उपायोजना व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज सायंकाळी खासदार शरद पवार महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते .

कोविड -१९ विरुद्ध लढण्यासाठी महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या वॉररूमला त्यांनी भेट दिली . यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले . खासदार शरद पवार यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वॉररूममार्फत सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने केलेल्या विविध उपाययोजना आणि व्यवस्थापनाची माहिती दिली . यावेळी उपमहापौर तुषार हिंगे , नगरसदस्य योगेश बहल , राजू मिसाळ , डब्बू आसवानी , मयूर कलाटे , नगरसदस्या मंगला कदम , वैशाली घोडेकर , वैशाली काळभोर , माजी आमदार विलास लांडे , माजी महापौर आझम पानसरे , संजोग वाघेरे , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , अजित पवार , प्रवीण तुपे , अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे , महिला वैद्यकीय अधिकारी डॉ . वर्षा डांगे , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे

कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते . शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या , रुग्ण बरे होण्याचे प्रमाण , रुग्णवाहिकांची संख्या , शहरातील उपलब्ध खाटांची संख्या , कोरोना टेस्टिंग लॅब्सची माहिती , महापालिका तसेच खाजगी रुग्णालयात कोरोना संदर्भात असलेल्या सुविधांची माहिती , डॉक्टर्स व नर्सेसची उपलब्धता , कोरोना काळामध्ये शहरातील उद्योग कामगारांची घेत असलेली काळजी आदी विषयांबाबत खासदार शरद पवार यांनी माहिती घेतली . यावेळी खासदार शरद पवार यांनी गरजू लोकांच्या उपचारासाठी ५० रेमडेसेवर इंजेक्शन महानगरपालिकेला दिली .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago