Editor Choice

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या घरांचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रणालीला राहिले फक्त १५ दिवस!

महाराष्ट्र 14 न्यूज, (३ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांचा अवलंब करुन ठिकठिकाणी आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत आहे . यास आता १५ दिवसच ( १७ सप्टेंबर २०२० पर्यंत ) बाकी राहिले आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनेकरिता मा.महापालिका सभा ठराव क्र .३९ , दि .२० / ०६ / २०१७ मंजूर आहे . सदर ठरावानुसार सद्यस्थितीत च – होली , रावेत व बोहाडेवाडी येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीघरे बांधणे प्रकल्प चालू आहेत . सदर प्रकल्पामध्ये १४ ते १५ मजली इमारतीमध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राच्या सदनिका बांधणेचे नियोजन आहे . सदर योजना ही खाजगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे ( Affordable Housing in Partnership ) या घटकाचा अवलंब करुन राबविणेत येत आहे . या घटकांतर्गत केंद्र शासनाकडून १.५ लक्ष व राज्य शासनामार्फत प्रति घरकुल र.रु .१ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहील .

पंतप्रधान आवास योजनेचे पिंपरी चिंचवड शहरातील इच्छुक नागरीकांना लाभ करुन देणेकामी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणेआहे :
१ ) सदर अर्ज भरणे प्रक्रियेचा कालावधी ३० दिवस ( दि .१७ / ०८ / २०२० ते दि .१७ / ० ९ / २०२० पर्यंत ) आहे . २ ) यापुर्वी फॉर्म भरलेले – ज्या नागरीकांनी यापुर्वीच्या सर्वेक्षणामध्ये भाग घेऊन अर्ज सादर केला होता त्यांनी भरलेल्या अर्जाची पावती ( Receipt ) तसेच त्यांच्या संपुर्ण परिवाराचे आधार कार्ड घेवून र.रु .५,००० / – ( डी.डी. ) आयुक्त , पिं.चिं.म.न.पा. यांचे नावे नजिकच्यानागरी सुविधा केंद्रामध्ये जमा केलेनंतर त्यांना पोहोच पावती देणेत येईल . तसेच मधील कालावधीत ( मे २०१७ ते सप्टेंबर २०२० ) नियमानुसार उत्पन्नापेक्षा वाढ अथवा स्वतःचे मालकीचे घर घेतल्यामुळे पुर्वी फॉर्म भरलेल्यांपैकी सदर इच्छुक नागरीक सोडतीत भाग घेणेस अपात्र ठरतील , ३ ) नव्याने फॉर्म भरणारे . ज्या नागरीकांनी यापुर्वीच्या सर्वेक्षणात भाग घेतलेला नव्हता त्यांनी मनपाने दिलेल्या लिंकद्वारे   http://103.224.247.133:8080/PMAY/#Again-No-back-button ऑनलाईन अर्ज करावा . सदर अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे ( आधार कार्ड , रेशन कार्ड , पॅन कार्ड , मतदान ओळखपत्र , प्रमाणपत्र , उत्पन्न दाखला किंवा स्वयंघोषणापत्र , बँक पास बुक , वीजबिल तीनप्रकल्पांसाठी र.रु .५,००० / – चा ( डी.डी. ) आयुक्त , पिं.चिं.म.न.पा.यांचे नावे , २ पासपोर्ट आकाराचे फोटो ) नजिकच्या नागरी सुविधा केंद्राकडून पडताळणी करुन घेणे आवश्यक राहील व त्याच ठिकाणी सदर फॉर्म , कागदपत्रे वडी.डी , जमा केलेनंतर पोहोच पावती देणेत येईल .

४ ) सदर प्रकल्पांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांची यादी लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रत्येक प्रकल्पाकरीताचे लाभार्थी निश्चित करुन लाभार्थ्यांची यादी वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येतील . ५ ) इच्छुक नागरीकांनी भरावयाच्या फॉर्ममध्ये तीन प्रकल्पांचा विकल्प भरणेस मुभा असेल . ६ ) र.रु .५००० / – ही पात्र लाभार्थ्यांच्या सदनिकेच्या किंमतीतून वजावट करणेत येईल व सदनिका न मिळालेल्या नागरीकांना सदर रक्कम परत करणेत येईल .

७ ) प्रतिक्षा यादी ठेवणे अथवा रद्द करणेचा कायदेशीर अधिकार मनपाने राखून ठेवलेले आहेत . सदर सर्व प्रक्रिया दि .१७ / ०८ / २०२० पासून सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये सुरु झाली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील प्रकल्पांची सद्यस्थितीत वाटप करण्याचे प्रस्तावित करणेत येत आहे . सदर प्रकल्पांना पर्यावरण दाखला व महारेरा अंतर्गत नोंदणी देखील करण्यात आलेली आहे . या प्रत्येक प्रकल्पांचे निविदेनुसार होणाऱ्या खर्चावर आधारीत प्रति सदनिका खर्च निश्चित केलेला आहे . प्रत्येक प्रकल्पासाठी लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे प्रपत्र अनुसार येत आहे .

उपरोक्त तक्त्याप्रमाणे प्रति सदनिकेसाठी केंद्रशासन र.रु .१.५० लाख , राज्य शासन र.रु .१ लाख अनुदान देणार आहे . तसेच उर्वरित रक्कम हा लाभार्थी हिस्सा राहणार असून तो ३ टप्प्यांमध्ये ( ४० % + ४० % + २० % ) लाभार्थ्यांकडून घेण्यात येणार आहे . सदर प्रकल्पाचे आर्थिकदृष्ट्या अतिकार्यक्षम व अतिव्यवहार्य ( Most Economical Feasibility ) वसुलीच्या पर्यायापैकी लाभार्थीकडून घरकुलच्या किंमतीपोटी वसूल करावयाचे हिश्श्याची रक्कम वरीलप्रमाणे असून सदर रक्कम बांधकामाच्या ठराविक टप्प्यानंतर घेणेत येणार आहे . हिश्श्याचे टप्पे रेरा नियमानुसार ठेवण्यात आलेले आहे . तसेच सदर प्रकल्पामधील मुलभूत सुविधाविषयक ( Infra work ) कामे , भाववाढ फरक अदायगी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे . म्हणजेच महानगरपालिकेचा आर्थिक सहभाग म्हणून सदर प्रकल्प मनपाचे जागांवर करणे व प्रकल्पातील सुविधा पुरविणेचा खर्च , विकास शुल्क माफी नवाढ खर्च , अस्थापना खर्च या स्वरुपात असणार आहे . सदर प्रकल्पांचे एकुण ३६६४ सदनिकांसाठी लाभार्थी व लाभार्थी हिस्सा व सोडत प्रक्रिया निश्चित करणेत येत आहे

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

14 hours ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

7 days ago