Google Ad
Editor Choice

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजय कुटे, अभिमन्यू पवार, जयंत पाटील यांची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ जानेवारी२०२३) : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व आमदार संजय कुटे, भाजप आमदार अभिमन्यू पवार, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना त्यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी येऊन श्रद्धांजली वाहिली. सर्वांनी त्यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचीही विचारपूस केली.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप जगताप यांचे सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतही त्यांनी चांगले राजकीय संबंध ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी पिंपळेगुरव येथील त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून सांत्वन केले. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर सदस्यांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.

Google Ad

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व विद्यमान भाजप आमदार संजय कुटे, आमदार अभिमन्यू पवार, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही रविवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या सर्वांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याशी संवाद साधून त्यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!