महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी महापौर मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (१८ जून २०२६) रात्री १०.२० वाजता दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासह क्रीडा वर्तुळावर आणि मोहोळ कुटुंबियांवर मोठी शोककळा पसरली आहे.
किसनराव मोहोळ हे त्यांच्या शिस्तप्रिय आणि मनमिळावू स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल ४० वर्षे सेवा निभावली होती. सहकार क्षेत्रातील योगदानासोबतच ते एक नामवंत पैलवानदेखील होते. कुस्ती क्षेत्राशी त्यांचे जवळचे नाते होते आणि त्यांनी अनेक पैलवान घडवण्यातही मोलाची भूमिका बजावली होती.

मोहोळ कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, किसनराव मोहोळ यांचे अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी पुण्यात होणार आहेत.
अंत्यदर्शन: शुक्रवार, दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी ७:०० ते सकाळी ९:०० वाजेपर्यंत.
ठिकाण: ‘वेणूकृष्णा’ निवासस्थान, कोथरुड, पुणे.
अंत्यसंस्कार : शुक्रवार, दिनांक १९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता.
ठिकाण: वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे.

















