महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २९ नोव्हेंबर २०२४ – नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २५ पुनावळे, वाकड आणि प्रभाग क्रमांक १६ रावेत, किवळे, मामुर्डी या परिसरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
यावेळी वाकड येथील टीपटॉप हॉटेलपासून अटलांटा २ सोसायटीकडे जाणारा १८.०० मी. रुंद डी.पी. रस्ता विकसित करणे, प्रभाग क्र. २५ पुनावळे येथील गायकवाडनगर मधील १८.०० मी. रुंद डी.पी. रस्त्याची उर्वरीत स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क. २५ पुनावळे येथील मुंबई-बैंगलोर हायवे पासून काटेवस्तीकडे जाणारा ३०.०० मी. डी.पी. रस्ता विकसीत करणे, पुनावळे येथील कोयतेवस्ती चौक ते जांबे गावाकडे जाणारा १८.०० मी. डी.पी. रस्ता विकसीत करणे, पुनावळे येथील बी.आर.टी. रोड पासून पुनावळे गावठाणातून पुनावळे मनपा दवाखाना जाणारा १८.०० मी. रुंद डी.पी. रस्ता विकसीत करणे, ताथवडे गावातून जिवननगरमार्गे MTU कंपनीकडे जाणारा १८.०० मी. डी. पी. रस्ता विकसीत करणे, रावेत व किवळे सीमेवरील (स.नं.७२,६६,६५,६४,६३,८४,१०५,
याप्रसंगी बोलताना जगताप म्हणाले की, चिंचवड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या भाजप महायुतीने दिलेल्या वचनाची पूर्तता करत, स्थानिक नागरिकांच्या मुलभूत सुविधा आणि वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे वाकड-पुनावळेकर आणि रावेत, किवळेकरांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या सुलभ वाहतूक, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर सेवा अधिक सोयीस्कर होतील. आम्ही यापुढील काळामध्ये चिंचवड विधानसभेला आणखी समृद्ध आणि सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, विनायक गायकवाड, मनोज खानोलकर, संगीता भोंडवे, ममता गायकवाड, प्रज्ञाताई खानोलकर, बाळासाहेब ओव्हाळ, भाजपचे शहर उपाध्यक्ष विशाल आप्पा कलाटे , राम वाकडकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भारती विनोदे, स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, दीपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे नवनाथ ढवळे,राहुल काटे, रणजित कलाटे, प्रसाद कस्पटे, अमोल कलाटे, श्रीनिवास कलाटे, संभाजी शिंदे, लक्ष्मणराव कोयते, दिलीप दर्शले, किसनराव सावंत, शंकरराव गायकवाड, हेमंत कोयते, विलास बोरगे, सुरेश रानवडे, सुरेश भुजबळ, दादा ढवळे, संतोष भुजबळ, अक्षय भुजबळ, धनाजी कोयते,
शांताराम भोंडवे, सचिन गावडे, प्रशांत पाटील, राहुल पाटील, सुधीर देवकर, बाबुलाल पाटील, अशोक आढाव, विनीत पाटील, गजानन पाटील, काशिनाथ गुरव , राहुल पाटील, पुरुषोत्तम पाटील, सतीश कदम, प्रवीण धकाते, अमोल पवार, तुषार रोडे, सुशांत चासकर, जितेंद्र नंदुरकर, सुदेश राजे, रावसाहेब डोंगरे, सुर्यकांत सोनार, गायकवाड आदी उपस्थित होते.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबला || ॥ ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ॥…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.३० नोव्हेंबर : राज्यात 5 तारखेला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी अजूनही बैठका सुरू आहे.…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२६ नोव्हेंबर - संविधानाने आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. संविधान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२६ नोव्हेंबर : सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्याही नावाचा समावेश असेल असा मोठा निर्णय…
महाराष्ट्र14 न्यूज,दि.२६ नोव्हेंबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने थेट 200चा टप्पा पार करत निर्विवाद बहुमत मिळविले.…