महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट – महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे देखरेखीखाली ठेवून त्यावर सातत्याने पाठपुरावा करावा, प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास शहरातील प्रश्न सोडवणे सुलभ होईल, असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन नवी सांगवी येथे गुरुवार (दि. ७ ऑगस्ट) रोजी सकाळी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
आमदार शंकर जगताप म्हणाले की, “महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्य, वाहतूक, ड्रेनेज अशा समस्यांचे गांभीर्याने देखरेख करावी आणि त्यावर वेळोवेळी पाठपुरावा करत अडचणींचा ठोस उपाय शोधावा. आमदार म्हणून आम्ही आमच्या पातळीवर हा पाठपुरावा करत असतो. मात्र प्रशासन आणि पदाधिकारी एकत्रितपणे कार्यरत राहिल्यास समस्या अधिक तत्परतेने सुटू शकतात.” वाहतूक विभागाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, “वाहतूक पोलिसांनी नागरिकांना लहान चुका दाखवून शिस्त लावल्यास भविष्यातील अपघात किंवा अडथळे टाळता येतील.”
नागरिकांनी मांडलेल्या विविध ७५३ तक्रारींचे तात्काळ निराकरण
‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमादरम्यान नागरिकांनी आरोग्य, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वाहतूक, शासकीय दाखले, रेशन कार्ड, वीजपुरवठा यांसारख्या विविध विभागांशी संबंधित एकूण ७५३ तक्रारी मांडल्या होत्या. या तक्रारींचे स्थानिक प्रशासन व विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ निराकरण करण्यात आले, ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली.
या कार्यक्रमाला माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, उषा मुंडे, माधवी राजापुरे, तसेच महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या अधिकारी वैशाली सागाडे, वाहतूक विभागाचे पीएसआय राजाराम काकडे, सांगवी पोलिस ठाण्याचे पीएसआय ढगे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर वाघमारे, जलनिस्सरण विभागाचे कार्यकारी अभियंता विजय ओव्हाळ, अ प्रभागाचे आरोग्य अधिकारी शिंदे, तहसीलदार जयराज देशमुख, रेशनिंग विभागाचे क्षीरसागर, विद्युत विभागाचे गवारी, पंचरसोत्तम समाज कल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी सतीश बंडगर हे उपस्थित होते.
यासोबतच मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, जिल्हा उपाध्यक्ष जवाहर ढोरे, प्रभाग अध्यक्ष शीतल आगरखेड, कृष्णा भंडलकर, शशिकांत (राजू) नागणे, डॉ. देवीदास शेलार, सुरेशदादा तावरे, सुर्यकांत गोफणे, अभय नरवडेकर, संजय जगताप, प्रदीप झांजुणे, दिलीप तनपुरे, सुरेश शिंदे, संतोष ढोरे,अशोक कवडे, सखाराम रेडेकर, गणेश बनकर, युवराज ढोरे, प्रमोद ठाकर, गणेश काची, हिरेन सोनवणे, संदीप दरेकर, दर्शना कुंभार, सोनाली शिंपी, अदिती निकम, सारिका भंडलकर, वैभव ढोरे, सुनील कोकाटे, उमेश झरेकर, अमोल तावरे, अमित घोडसाळ, शुभम बेंडे, सचिन कोळमकर, शैलेश बासुतकर, राजेश शिंत्रे, सचिन खराडे, गिरीश देवकाते, रोहन भिसे, जगदीश तांबे, मयूर पठारे, प्रतिम बालवडकर, सुजित घोंगडे,संजय मराठे, राहुल पन्हाळे, शाहरुख सय्यद, अमोल गायकवाड, निलेश सरोदे, योगेश मोहरे, विनायक शिंदे, अमित गवळी, अविनाश गायकवाड, संदीप तांबे, दीपक ओगले, साई कोंढरे, प्रवीण जगताप, राजू मोरे, गणेश चोबे, रमेश गाढवे,शहाजी पाटील, सोमनाथ कातोरे, गणेश कणगे, संतोष पवार, प्रवीण भोसले, राजू मोरे यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 07 ऑगस्ट -- राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वहायला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि..04 ऑगस्ट :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याची जागेवरच…