महाराष्ट्र 14 न्यूज, २१ ऑक्टोबर – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी उमेदवारी जाहीर होताच नवी सांगवी परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी आणि बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जगताप यांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र राजापूरे, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेवक शैलेश मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, मा. नगरसेवक बळीराम जाधव, सूर्यकांत गोफणे, प्रकाश शितोळे, आप्पा पाटील, सखाराम रेडेकर, राजेंद्र पाटील, नारायण भुरे, डॉ. देविदास शेलार, गिरीश देवकाते, भास्कर गाडेकर, अविनाश भुरे , अभिमन्यू गाडेकर, संदीप दरेकर, संजय मराठे, ह.भ.प. वाघ महाराज, ललित म्हसेकर, संग्राम शेलार, भूषण थोरवे, बाळा खुंटे, राजू नागणे, गणेश बनकर, राहुल शिंदे, अमित घोडसाळ, प्रवीण पाटील, सुरेश शिंदे, सचिन खराडे, अशोक कवडे, अजय दुधभाते, राजबाबू सरकनिया, सत्यवान ज्ञानी, भाऊसाहेब जाधव, अमोल तावरे, शुभम फरांदे, किशोर शिंदे, रोहन दुर्गे, अविनाश जाधव, प्रवीण जगताप, राजेश पवार, जयसिंग जाधव, राजू मोरे, अरविंद नाळे, संदीपान सामसे, दिनकर मोहिते, शामराव धस, आशिष कवडे, हनुमंत डुंबरे, राजू पाटील, सुनील भिसे, अनिल शिर्के, साईश कवाडे, यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी शंकर जगताप यांनी नवी सांगवीतील फेमस चौक, स्वामी विवेकानंद सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर,
याप्रसंगी जगताप यांनी नवी सांगवी प्रभागातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्य यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. त्याचबरोबर सर्व धार्मिक स्थळांनाही भेट देत तेथील प्रमुखांशीही चर्चा केली. विशेषतः या परिसरातील सर्व सोसायटींना भेट देऊन संबंधित सोसायटीचे चेअरमन, कार्यकारिणी सदस्य आणि रहिवाश्यांची बैठक घेऊन त्यांच्याशीही जगताप यांनी संवाद साधला.
दरम्यान, ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून तर नागरिकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘अब की बार, शंकरभाऊ आमदार’ अशा घोषणा देत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास, यावेळी जगताप यांना दिला.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…