विवाहित प्रियकराचा लग्नास नकार … चिंचवडमध्ये प्रेयसीने लॉजवर बोलावून गळा आवळला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ऑगस्ट) : विवाहित प्रियकराने लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीने त्याचा खून केल्याची घटना पुण्यातील चिंचवडमध्ये समोर आली आहे. प्रेयसीने विवाहित प्रियकराला लॉजवर बोलवून कायमचा काटा काढला. पैगंबर गुलाब मुजावर असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर 29 वर्षीय प्रेयसीला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मयत पैगंबर याच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैगंबर आणि आरोपी तरुणी हे दोघे जण एकाच ठिकाणी कामाला होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पैगंबर हा आरोपी तरुणीला भेटायला जात नव्हता. तसेच त्याने लग्न करण्यासही नकार दिला होता. याच कारणावरुन त्याचे  प्रेयसीशी वारंवार वाद होत होते.

दोन दिवसांपूर्वी प्रेयसीने पैगंबर याला चिंचवड स्टेशन येथील व्हाईट हाऊस लॉजमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. रात्री दहा वाजताच्या सुमारास तिने पैगंबर बेशुद्ध पडल्याचे लॉजमधील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांनी पैगंबर यास तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी 29 वर्षीय प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

24 mins ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

11 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

11 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago