Categories: Uncategorized

मनोज ब्राम्हणकर यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या सहसंपर्क प्रमुखपदी निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज ब्राम्हणकर यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मनोज ब्राम्हणकर यांची  भाजप ओबीसी मोर्चाच्या  सहसंपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांना भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

निवड झाल्यानंतर बोलताना मनोज ब्राम्हणकर म्हणाले, “प्रदेश पदाधिकारी होऊन आपण भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवुन देण्यासह पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे काम तळागळातील सर्व सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम करेल”.

मनोज ब्राम्हणकर यांची  भाजप ओबीसी मोर्चाच्या  सहसंपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

महाराष्ट्राचा 58 व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ …. पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 :  महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…

1 day ago

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

5 days ago

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…

1 week ago

अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! महसूल फडणवीसांकडे, अर्थ खाते अजितदादांकडे, तर ….

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…

1 week ago

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज … हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारची लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…

1 week ago

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…

2 weeks ago