महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मार्च) : सर्व महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे. तसा राज्य सरकारचा शासन अध्यादेश (GR) जारी झाला आहे. त्यामुळे आजपासून महिलांना 50 टक्के सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थसंकल्प 2023मध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
राज्य सरकारचा जीआर निघाल्याने आजपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारे आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या यात साधी, मिडी, मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवसेनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत) या बसमध्ये आजपासून 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. तसेच यापुढे ज्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्ये ही सवलत मिळणार आहे.
तसेच जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेद्वारे आरक्षण करतील, मोबाईल अॅपमाध्यमातून तिकीट घेतील त्यांच्याकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी मात्र, ज्या महिलांनी आधी तिकीट आरक्षण केले आहे. त्यांना याचा लाभ मिळणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जात आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…