Categories: Uncategorized

शास्तीकर रद्द व्हावा यासाठी लक्ष्मण भाऊंनी मोठा संघर्ष केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ फेब्रुवारी) : चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे आयोजित प्रचार सभेत अनेकांनी फटकेबाजी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी सांगवी येथे सभा झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांचीही भाषणे झाली.

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नसता तर त्यांचा मोठेपणा दिसला असता. पण आता ठीक आहे, दिवंगत लक्ष्मणभाऊंची काय ताकद आहे हे या निवडणुकीतून आम्ही दाखवून देऊ तसेच भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या सरकारने पिंपरी-चिंचवडकरांसाठी नियमाच्या बाहेर जाऊन आंद्रा धरणातील २५० एमलडी पाणी मंजूर केले आहे. वाढणाऱ्या या शहराची गरज लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला होता. हे पाणी हे पाणी लवकरच शहरापर्यंत पोहोचणार आहे. त्यातून या शहराची तहान भागवण्याचे काम निश्चितपणे पूर्ण केले जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी सांगवी येथील सभेत सांगितले.

. यावेळी भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार, तुषार राठोड, प्रसाद लाड, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, माजी खासदार अमर साबळे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, रासपचे शहराध्यक्ष भारत महानवर, प्रहारचे संजय गायके आदी उपस्थित होते.

मोगलांच्या काळातील जिझिया करासारखा केवळ पिंपरी-चिंचवडकरांवर हा कर लावण्यात आला होता. लोकांना मोठ्या प्रमाणात नोटीस देण्यास सुरू केले होते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे शासन होते. त्यांना अचानक स्वप्न पडले आणि शहरात शास्तीकर लावला. पण भाजप-शिवसेना महायुती सरकारने एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा शास्तीकर रद्द केला. नंतर नवीन सरकार आल्यानंतर लक्षात आले की एवढ्याने नागरिकांची सुटका होत नाही. त्यामुळे शास्तीसारखा जिझिया कर संपूर्णपणे रद्द करण्याची घोषणा विधानसभेत केली आहे. त्याचा शासन आदेश काढला नाही, तर सरकारवर हक्कभंग येतो. त्यामुळे विधानसभेत केलेल्या घोषणेचा शासन आदेश काढावाच लागतो. केलेल्या घोषणेप्रमाणे नक्कीच शासन आदेश काढून शास्तीकर संपूर्णपणे रद्द करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.” शास्तीकर रद्द व्हावा यासाठी लक्ष्मण जगताप यांनी मोठा संघर्ष केला, त्याचीही आठवण त्यांनी करून दिली.

यावेळी बोलताना भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप म्हणाल्या, तुमचे लक्ष्मणभाऊ, माझे साहेब गेले, पण आपला गड आपणाला राखायचा आहे, अशी भावनिक साद चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. २३) घातली. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना भरून आले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

महाराष्ट्राचा 58 व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ …. पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 :  महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…

21 hours ago

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…

5 days ago

पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…

1 week ago

अखेर खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला! महसूल फडणवीसांकडे, अर्थ खाते अजितदादांकडे, तर ….

महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…

1 week ago

लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज … हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महायुती सरकारची लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…

1 week ago

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…

2 weeks ago