Google Ad
Uncategorized

Mumbai : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक
एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 10 : भारत निवडणूक आयोगाने 215- कसबा पेठ व 205 – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध केला आहे. या पोटनिवडणुकीसह देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Google Ad

त्यामुळे दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सकाळी सात वाजेपासून ते दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 126 (1) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!