Google Ad
Uncategorized

अखेर शिवसेना पिंपरी चिंचवड मधील ‘या’ नेत्यावर कारवाई करणार

महाराष्ट्र 14 न्यूज,( दि.11 फेब्रुवारी): पिंपरी चिंचवड मधील ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आणि अखेरीस त्यांनी माघार घेतली नाही. खरंतर चिंचवडची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं ठरलं आहे. राष्ट्रवादीने या जागेवर नाना काटे यांना उमेदवारी दिलीय. पण राहुल कलाटे उमेदवारीसाठी जास्त आग्रही होते. त्यामुळे त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना पक्षाकडून अधिकृतपणे एबी फॉर्म देण्यात आलेला नसल्याने ते अपक्ष उमेदवार आहेत.

Google Ad

राहुल कलाटे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात आली. पण ते अर्ज मागे घेण्याच्या तयारीत नव्हते, आणि अखेरीस त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम केला. विशेष म्हणजे त्यांची समजूत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत: संपर्क प्रमुख सचिन अहिर यांना पाठवलं होतं. पण राहुल कलाटे यांनी सचिन अहिर यांची विनंती देखील ऐकली नाही. कलाटे यांनी अहिर यांचं ऐकून अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत सचिन अहिर यांनी स्वत: ही माहिती दिली.

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र अखेरी स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी अर्ज माघार घेतला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी आता होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!