Google Ad
Uncategorized

चिंचवड पोट निवडणूकीत रंगत वाढली … महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘बॅकफुट’वर … तर यांनी घेतली माघार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.10 फेब्रुवारी) : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘बॅकफुट’वर गेली आहे. विशेष म्हणजे, याचा फायदा भाजपा+बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना होणार असून, त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Google Ad

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये आज (दि. १०) शेवटच्या दिवशी ५ जणांनी माघार घेतली आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत ३३ पैकी पाच जणांनी माघार घेतल्यामुळे तब्बल २८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणार उरले आहे.

▶️यांनी घेतले आपले उमेदवारी अर्ज माघार ...

१) राजेंद्र मारुती काटे २) भाऊसाहेब रामचंद्र अडागळे ३) प्रविण अशोक कदम ४) अॅड. मनिषा मनोहर कारंडे ५) रविंद्र पारधे (सर)

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!