Google Ad
Uncategorized

जुनी सांगवी येथील कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव गुरूवारपासून नागरिकांसाठी खुला..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ५ मार्च २०२४ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाकडील जुनी सांगवी येथील कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव गुरुवार ७ मार्च २०२४ रोजी सर्व नागरिकांसाठी खुला करण्यात येत आहे. या जलतरण तलावावर महापालिकेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत येणार आहेत. त्यामध्ये सर्व जलतरण तलावांसाठी ऑनलाईन तिकिट बुकिंग/पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलावाची वेळ स.६ ते स.०९.४५ व दु.२.३० ते सायं ६.१५ अशी आहे. सदर जलतरण तलावासाठी उन्हाळी शिबीर सुविधा स. १० ते दु. १२ पर्यंत असणार आहे. या जलतरण तलावावर लहान मुलांसाठी बेबी टैंक ची देखील सुविधा आहे. सदर जलतरण तलावावार सुरक्षेच्या दृष्टीने मेस्को या संस्थेमार्फत जीवरक्षक तथा सुरक्षा अधिकारी आणि व्यवसथापक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. www.pcmcindia.gov.in  या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळारुन बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व नागरिकांनी या जलतरण तलावाचा लाभ घ्यावा असे आवाहन, महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!