Google Ad
Uncategorized

गोसेवक विजय जगताप यांनी दिला लोटे गो शाळेला ७० टन चारा … ह. भ. प. भगवान कोकरे महाराज यांनी मानले आभार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ मार्च) : चिपळूण येथील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेचे संस्थापक ह. भ. प. भगवान कोकरे महाराज आमरण उपोषणाला बसले होते. हे समजताच माजी आमदार स्व. लक्ष्मणदाद जगताप यांचे बंधू विजय जगताप आणि कुटुंबियांनी ७० टन चारा खरेदी करून गो शाळेला पाठवून देण्यास प्रारंभ केला असून दोन गाड्या नुकत्याच येथे दाखल झाल्या. जगताप कुटुंबियांच्या या दातृत्वाबद्दल कोकरे महाराजांनी समाधान व्यक्त करून त्यांचे मनस्वी आभार मानले.

बदलते हवामान, वणवे यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही. चारा टंचाईवर शासनाने काही ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी कोकरे महाराज यांनी केली व उपोषण सुरु केले होते. लोटे गो शाळेत ११०० गायी आहेत. चाऱ्याअभावी या गायींची उपासमार होत आहे. परिसरातील डोंगराला काही समाज कंटकांनी वणवे लावल्याने चारा जळून खाक झाला, अशा वेळी या गायींना जगवायचे कसे, असा प्रश्न गो शाळा संचालकांसमोर पडला.

Google Ad

त्यानुसार चान्यासाठी आवाहन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडचे जगताप कुटुंबाने प्रतिसाद देत विजय जगताप यांनी ७० टन चारा खरेदी केला आहे. त्यातील पहिले दोन ट्रक चारा गो शाळेत दाखल झाल्याने गायींच्या पुढील दोन महिन्याच्या वैरणीचा प्रश्न मिटला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!