महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० डिसेंबर) : चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एन्टरप्राईज यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील उद्योजकीय वृत्ती जागृत करण्याच्या उद्देशाने ‘इनोव्हेशन टू एंटरप्राइज’ (आयटूई) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कल्पना सादर केल्या. आयआयएमएस चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या पहिल्या गटात पल्लवी देवरे व सरिता साळुंके या विद्यार्थिनींनी ‘हायड्रो युग’ ही अभिनव संकल्पना सादर केली. मातीचा कमीत कमी वापर करीत व पाण्याचा वापर करून हायड्रोपोलिक तंत्रज्ञानाचा वापर करीत घरातल्या घरात किंवा अतिशय छोट्या जागेत भाजी पाला पिकवून उत्तम व्यवसाय तयार होऊ शकतो असे या संकल्पनेत मांडण्यात आले.
तर दुसऱ्या गटातील विद्यार्थी हरिदास खारखडे याने वाढत्या नागरीकरणामुळे परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सिमेंट पाइपचा वापर करून अल्प उत्पनामध्ये घरे उपलब्ध करून देणारी संकल्पना मांडली.
तर स्पर्धेच्या तिसऱ्या गटात श्रुती कोडक हिने प्लास्टिक पिशव्यांचे रूपांतर फॅब्रिक हँडलूममध्ये करून आकर्षक पिशव्या तयार करण्याची व्यवसाय संकल्पना मांडली. डॉ. वंदना मोहांती व डॉ.सचिन मिसाळ यांनी परीक्षक म्हणून तर प्रा. स्वाती भालेराव यांनी या स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून काम पाहिले.
अधिक माहितीसाठी संपर्क
योगेश रांगणेकर
मो : 7350014536 / 9325509870
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…