Google Ad
Education

ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राला सुवर्ण पदक 

महाराष्ट्र 14 न्यूज,(०७ ऑगस्ट) : जपानच्या टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताने आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकली आहेत. नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले. यापूर्वी २००८ मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

सात पदके जिंकली
२३ वर्षीय नीरजने पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकला होता. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडीत काढला आहे. भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली आहेत. भारताने याआधी २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकली होती. ती कामगिरी भारताने आता मागे टाकली आहे.

Google Ad

नीरजने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण कामगिरी केली. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्ण पदक असून अॅथलेटिक्समधीलही भारताचे हे पहिले पदक आहे. भाला फेकण्याच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा अगदी सुरुवातीपासूनच आघाडीवर होता.

त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भाला फेकला. दुसऱ्यांदा त्याने ८७.५८ मीटर अंतर कापले. नीरजसह १२ स्पर्धक अंतिम फेरीत होते. यामध्ये वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. एवढ्या सर्वांसमोर त्याने आपले सर्वोत्तम प्रदर्शन दाखवले.

१२१ वर्षांनी घडवला इतिहास
ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. त्यानंतर तब्बल १२१ वर्षांनी भारतीय खेळाडूने ही कामगिरी केली आहे. भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत पाच मेगा क्रिडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत. यात आशियाई, राष्ट्रकुल, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धांचा समावेश आहे. नीरजने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.

नीरजचा जन्म हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावच्या एका शेतकरी कुटुंबात २४ डिसेंबरला जन्म झाला होता. नीरजने त्याचे शिक्षण चंदीगढ येथे पूर्ण केले. २०१६ मध्ये पोलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील आयएएएफ जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवले होते. यानंतर नीरज चोप्राची इंडियन आर्मीत ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!