कोरोनामुळे पिंपरी चिंचवड मनपातील भाजपचे विध्यमान नगरसेवक ‘लक्ष्मण उंडे’ यांचे निधन!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरीचिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होताना दिसत आहे. कोरोनाच्या या संसर्गाने शहरातील तीन विद्यमान नगरसेवकांचा बळी घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक जावेद शेख, नगरसेवक दत्ता साने आणि आज भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे . तसेच माजी नगरसेवक एकनाथ थोरात, साहेबराव खरात, माजी महापौर फुगे, लक्ष्मण गायकवाड या चार माजी नगरसेवकांचे देखील कोरोनामुळे निधन झालेे .

आज शनिवारी पिंपरी चिंचवड मनपातील भाजपचे विध्यमान नगरसेवक लक्ष्मण उंडे यांनी चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. त्यांना महिनाभरापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यातच मधुमेहाचा त्रासाने परिस्थिती अधिक खालवल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अखेर महिन्यापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर आज संपली.

अगदी शांत स्वभावाचे लक्ष्मण उंडे अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रभाग चार दिघी-बोपखेल मधील भारतीय जनता पक्षाचे विध्यमान नगरसेवक होते, नगरसेवक होण्याअगोदर ते भारतीय लष्करी सेवेतून निवृत्त झाले होते. समाजकार्याची आवड असल्याने ते राजकारणात आले , देशसेवक, भाजप कार्यकर्ता, स्थायी समिती सदस्य असा त्यांचा जीवन प्रवास होता.

Maharashtra14 News

Recent Posts

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

11 hours ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

21 hours ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

3 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

4 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

5 days ago