Google Ad
Uncategorized

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत … झाले हे सहा महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ डिसेंबर) : राज्य मंत्रिमंडळाची  आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गृह, महसूल , पणन, उच्चव तंत्र शिक्षण ते वैद्यकीय अशा वेगवेगळ्या विभागांसंदर्भात सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागा संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारने कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळामध्ये एक वर्षाची इंटर्नशिप देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व निर्णयाची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Google Ad

झाले हे महत्त्वाचे निर्णय : –

1) गृह विभाग : फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळामध्ये इंटर्नशिप मिळणार

2) पणन विभाग : बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

3) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग : कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची स्थापना करणार

4) उच्च व तंत्र शिक्षण विभाग :

1) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना इरादापत्रासाठी मुदतवाढ
2) मौजा वारंगा येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी वसतीगृह व निवासी इमारती

5) महसूल विभाग : कंपनी एकत्रिकरण, विलगीकरणाच्या दस्तांवर मुद्रांक शुल्क आकारण्याच्या अधिनियमात सुधारणा

6) सार्वजनिक आरोग्य विभाग : जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!