Google Ad
Uncategorized

आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ०४ आरोपीना अटक … ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे उघड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ जुलै) : आय. टी कंपनीत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवुन लाखो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ०४ आरोपीना गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड कडुन अटक केले असून, त्यात त्यांनी ६० ते ७० मुला-मुलींना फसवल्याचे उघड झाले.

या गुन्ह्यात कमलेश पंढरीनाथ गंगावने, वय ४० वर्षे, रा- ११ साई अंगण सोसायटी, तापकिर नगर, काळेवाडी पुणे व त्यांचे इतरसहकाऱ्यांनी वेळोवेळी टेक्नालॉजी एस. ए. पी. एम. एम कंपनी व एम के मैनेजमेंट सर्व्हिस नावाने जॉबचे अँड देणाऱ्या कंपनीचे मालक महेशकुमार कोळी व कंन्सल्टन्सी ओनर कल्पना मारुती बखाल, सुरज महाले, रा-चंदननगर, पुणे श्रावण शिंदे यांनी मिळून फिर्यादी तसेच त्यांचे इतर साथिदाराना अनुदिप शर्मा पशुपती याचे ई पेवेलिन कंपनी खराडी, पुणे प बैंक्यू सॉफ्टवेअर सिस्टम्स प्राव्हेट लिमिटेड, विमाननगर येथे बनावट आयटी कंपनी मध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ६० ते ७० मुला-मुलींची एकुण ५० लाख रुपये फोन पे गुगल पे व चेक व्दारे वेळोवेळी स्विकारुन अस्तित्व नसलेल्या बनावट कंपनीचे बनावट नेमणुक पत्र (अपॉर्टमेंट लेटर) देवुन आर्थिक फसवणूक व विश्वासघात केला.

Google Ad

यात भोसरी पोलीस ठाणे, येथे गुन्हा नोंद होता. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त सो विनयकुमार चौबे साहेब व आम्ही सदरच्या गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शंकर आवताडे यांना करण्याचे आदेशित केले होते. तेव्हा गुन्हे शाखा युनिटचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास तात्काळ सुरु करुन शिताफीने पिंपरी चिंचवड परिसरातुन आरोपी महेशकुमार हरिचंद्र कोली, वय-३२ वर्षे, रा५५ सुखनिवास सोसायटी, लडकत पेट्रोलपंपा जवळ, सोमवार पेठ, पुणे २) अनुदिप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा, वय ५२ वर्षे. रा-लेन नंबर १२ श्री राम पी.जी. जवळ, कानदवे नगर, बाघोली, पुणे ३) महिला आरोपी नामे मारुतराव बखाल वय ३० वर्षे, रा-बाबर सोळंकी रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर-४०२ ए विंगए दत्त नगर कल्पना दिघी पुणे. ४) श्रावण एकनाथ शिंदे, वय-३२ वर्षे, रा. फ्लॅट नंबर-४ लिमकर बिल्डींग, अजमेरा सोसायटी जवळ, तुकाराम नगर, वाघोली, पुणे यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान केलेल्या तपासात आरोपी क्र २ याने बनावट कंपनीचे बनावट नेमणुक पत्र (अपॉर्टमेंट लेटर) देवुन तसेच आरोपी क्र १ ३ व ४ यांनी आरोपी नामे अनुदिप शर्मा याची बनावट कंपनी असल्याचे माहित असुनही फिर्यादी तसेच त्यांचे इतर साथिदारांची आयटी कंपनीत नोकरीला लावती असे सांगुन लाखो रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दाखल गुन्हयाचा अधिक तपास गुन्हे

शाखा युनिट ४ थे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शंकर आवताडे हे करत आहे. अशा प्रकारे वरील आरोपीकडुन नोकरीला लावतो असे सांगुन अधिक कोणाची फसवणुक झालेली असल्यास गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!