Google Ad
Uncategorized

ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत, नीलम गोऱ्हे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ जुलै) : राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे) गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिले आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

मात्र, विधानपरिषदेतील आमदार ठाकरेंसोबत होते. परंतु काही दिवसांपूर्वी आमदार मनिषा कायंदे यांनी पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेनेत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रवेश केला आहे.

Google Ad

नीलम गोल्हे या ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यही करतात. महिलांच्या प्रश्नी त्या कायम तत्पर असतात. पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार यावर त्या काम करतात.

त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे उपनेत्याही आहेत. पक्षाची राजकीय भूमिका आजपर्यंत त्या जनतेसमोर मांडत आल्या आहेत. शिवसेनेच्या कोट्यातून २००२ पासून आतापर्यंत विधान परिषदेत संधी मिळाली. सध्या त्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे पदावर कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत उपस्थित होते. आता नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!