Categories: Uncategorized

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं

पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ९ सप्टेंबर २०२५:* पिंपरी चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा डॉजबॉल स्पर्धा नुकतीच एच. ए. स्कूल पिंपरी येथे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व उपायुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका सुजाता कोरके, आशा माने तसेच क्रीडाधिकारी रंगराव कारंडे यांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा समन्वयक कन्हेरे यांनी केले, तर क्रीडाशिक्षक मुकेश पवार, हनुमंत सुतार व शिवाजी मुटकुळे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले. पंच म्हणून पिंपरी चिंचवड डॉजबॉल संघटना व पुणे जिल्हा डॉजबॉल संघटनेचे सचिव रामेश्वर हराळे व त्यांच्या टीमने काम पाहिले. स्पर्धेत खेळाडूंनी दमदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:

१७ वर्षे मुलगे गटात एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण १०) यांनी शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम, निगडी (गुण ४) यांचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय स्थानावर सावित्रीबाई फुले शाळा, मोशी (गुण ५) तर चौथ्या स्थानावर एम. एम. विद्यामंदिर, काळेवाडी (गुण ३) राहिले.
१७ वर्षे मुली गटात एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण १६) यांनी विद्यानंद भवन स्कूल, निगडी (गुण ०) यांचा पराभव करून विजेतेपद मिळवले. तृतीय स्थान सेंट पीटर स्कूल (गुण ५) यांनी मिळवले तर पीसीएमसी पिंपळे गुरव विद्यालय (गुण २) चौथ्या स्थानावर राहिले.

१९ वर्षे मुली गटात शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम, निगडी (गुण ६) यांनी एच. ए. स्कूल, पिंपरी (गुण २) यांचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय स्थान एम. एम. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळेवाडी (गुण ९) यांनी मिळवले तर सेंट उर्सुला हायस्कूल, निगडी (गुण १) चौथ्या स्थानावर राहिले.

या स्पर्धेत एच. ए. स्कूल, पिंपरीने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण दोन विजेतेपद पटकावून आपला डंका वाजवला. स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात….* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग….

*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…

5 days ago

पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे संयुक्त उपक्रमातून एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन

*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…

1 week ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने दिव्यांग सर्वेक्षणासाठी आशा सेविकांना देण्यात आले विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…

2 weeks ago

शंभरपेक्षा अधिक घरफोड्या, सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर  : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…

2 weeks ago

पुण्यात इंटेन्सिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयात ‘एचआयव्ही’बाबत जागृती

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…

3 weeks ago