Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरात किरणा दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेला तब्बल एक लाख 95 हजारांचा गुटखा जप्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५नोव्हेंबर) : शहरात किरणा दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेला तब्बल एक लाख 95 हजारांचा गुटखा नुकताच जप्त करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तेजमल हरकचंद सुंदेचा (वय 42), राजेंद्र किसन साठे (वय 49, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी)यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी तेजमला यांचे संत तुकाराम नगर येथे कानिफनाथ जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात एक लाख 95 हजार 170 रुपयांचा गुटखा विक्रीसाठी ठेवला. राजेंद्र याने त्याची खोली गुटखा साठवणूक करण्यासाठी उपलब्ध करून दिली. तर आरोपी सागर पाटील याने गुटखा विक्रीसाठी आरोपी तेजमल याला पुरवला असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाने दिली आहे .

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!