Google Ad
Uncategorized

शिवशाहीरांच्या निधनावर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ट्विट, … छत्रपतींच्या इतिहासाचा संशोधनकार, साहित्यिक, अभ्यासक हरपला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५नोव्हेंबर) : मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयानं बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचं निधन वृद्धापकाळानं झाल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे.

शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने राजकीय विश्वासही दु:खद वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

Google Ad

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकुन अतिशय दुःख झाले. छत्रपतींच्या इतिहासाचा संशोधनकार, साहित्यिक, अभ्यासक हरपला, माझी भावपुर्ण श्रद्धांजली ! असे ट्विट आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!