महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी बँकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात आल्याचे नुकत्याच झालेल्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष शंकर जगताप यांनी जाहीर केला. तो सर्व सभासदांच्या खात्यावर आजच जमा झालेला असेल, आणि तो रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार देण्यात येतो, असेही ते म्हणाले. या निर्णयाचे सभासदांनी जोरदार स्वागत केले. तर यावेळी व्यवस्थापक संजय बाईत यांनी अहवाल वाचन करत सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
श्री गणेश सहकारी बँकेचे 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विध्यमान आमदार आणि अध्यक्ष शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला उपाध्यक्ष संतोष सखाराम देवकर, संचालक सदस्य संजय गणपत जगताप, दत्तात्रय गोविंद चौघुले, राजेंद्र शंकर राजापुरे, अंकुश रामचंद्र जवळकर, सुरेश शंकर तावरे, शिवलिंग बसवंतप्पा किंणगे, मधुकर सोपान रणपिसे, सुरेश तात्याबा शिंदे, अभय केशव नरडवेकर, प्रमोद नाना ठाकर, राजश्री बिभीषण जाधव, शैला जनार्दन जगताप, शिवाजी शिंदे , ऍड. श्रीकांत दळवी, व्यवस्थापक संजय बाईत, ईश्वर काटे आणि बँकेचे कर्मचारी व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी बँकेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीगणेश सहकारी बँकेने सभासदांच्या विश्वासावर आपली नियमित प्रगती केली आणि आजही करत आहे. यामुळे बँकेवर तिच्या ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे आपण आज सभासदांना 15%असा जास्तीत जास्त लाभांश देऊ शकलो, यापुढे अजून जास्तीत जास्त सभासद वाढवून बँकेचे भाग भांडवल आणि ठेवी कश्या वाढतील याचा आम्ही सर्व संचालक प्रयत्न करत राहू, तसेच आगामी काळात बँके मार्फत नवनवीन योजना राबविल्या जातील, लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर व बँकेवर ज्या पद्धतीने सभासदांनी व खातेदारांनी विश्वास ठेवला, तोच विश्वास आणि बँकेची नियमित प्रगती साधण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी आम्ही सर्व संचालक कटिबद्ध आहोत.
आमदार शंकर जगताप, अध्यक्ष. श्री गणेश सहकारी बँक मर्या., पिंपळे गुरव.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास करता येवू शकतो, हे बँकेने २८ वर्षात दाखवून दिले, बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवा, बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आकर्षक कर्ज योजना, ठेव योजना यामुळे बँकेकडे ग्राहकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. श्री गणेश सहकारी बँक ही लोकसेवेचा वसा घेतलेली बँक असून, बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना याचा मोठा फायदा झाला आहे.
बँकेचे संचालक मधुकर रणपिसे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…