महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.21मे) : लोकमतच्या वतीने ‘करिअर मंत्रा’ शैक्षणिक प्रदर्शन शनिवार व रविवारी ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पार पडले. या शैक्षणिक प्रदर्शनात शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था तसेच क्लासेसचा सहभाग होता. पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसने देखील या प्रदर्शनात सहभाग घेऊन उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना क्लासमधील उपलब्ध शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दरम्यान लोकमतच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत व प्रदर्शनातील सहभागाबद्दल जिनियस क्लासेसचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिनियस क्लासेस, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी, कासारवाडी या भागातील अल्पावधीत नावारूपाला आलेला क्लास म्हणून जिनियस क्लासेसने ओळख निर्माण केली आहे.या क्लासेसमध्ये अनुभवी व तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ५ वी ते आहे. १२ वी पर्यंतचे अध्यापन केले जाते. तसेच सायन्स कॉमर्स, जेईई, नीट, सीईटी प्रवेश परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने क्लासमध्ये गेस्ट लेक्चरर्सचे आयोजन केले जाते. आतापर्यंत क्लासमधून ३०० हुन अधिक विद्याथी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
सामान्य विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळातही शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवून पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या विश्वासास आम्ही पात्र राहू.
*सौ. तेजस्विनी महादेव मासाळ*
संचालिका जिनियस क्लासेस, पिंपळे गुरव
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…