महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री गणेश सहकारी बँकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा एकमुखी ठराव नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष शंकर जगताप यांनी जाहीर केला. तो रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार देण्यात येतो, त्याप्रमाणे तो देण्यात येईल, असेही ते म्हणाले. या निर्णयाचे सभासदांनी जोरदार स्वागत केले. राजेंद्र राजापुरे यांनी अहवाल वाचन केले, तर व्यवस्थापक संजय बाईत यांनी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
श्री गणेश सहकारी बँकेचे २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला उपाध्यक्ष संतोष सखाराम देवकर, संचालक सदस्य संजय गणपत जगताप, दत्तात्रय गोविंद चौघुले, राजेंद्र शंकर राजापुरे, अंकुश रामचंद्र जवळकर, सुरेश शंकर तावरे,
शिवलिंग बसवंतप्पा किंणगे, मधुकर सोपान रणपिसे, सुरेश तात्याबा शिंदे, शहाजी भगवानराव पाटील, अभय केशव नरडवेकर, प्रमोद नाना ठाकर , राजश्री बिभीषण जाधव, शैला जनार्दन जगताप , संजय बाईत, ईश्वर काटे आणि बँकेचे कर्मचारी व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश सहकारी बँकेने आपली नियमित प्रगती केली आणि आजही करत आहे. यामुळे बँकेवर तिच्या ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यावर व बँकेवर ज्या पद्धतीने सभासदांनी व खातेदारांनी विश्वास ठेवला, तोच विश्वास आणि बँकेची नियमित प्रगती साधण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी आम्ही सर्व नवनिर्वाचित संचालक कटिबद्ध आहोत.
शंकर जगताप, नवनिर्वाचित संचालक. श्री गणेश सहकारी बँक मर्या., पिंपळे गुरव.
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास करता येवू शकतो, हे बँकेने २८ वर्षात दाखवून दिले, बँकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या तत्पर सेवा, बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आकर्षक कर्ज योजना, ठेव योजना यामुळे बँकेकडे ग्राहकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. श्री गणेश सहकारी बँक ही लोकसेवेचा वसा घेतलेली बँक असून, बँकेच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांना याचा मोठा फायदा झाला आहे.
बँकेचे संचालक मधुकर रणपिसे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.३१ जानेवारी : मागील काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये महापालिका निवडणूका (PCMC Election 2026)…
'शापित उपमुख्यमंत्री' काही माणसांबद्दल आपल्याला कायम कुतूहल वाटतं, ते कुतूहल त्यांच्या दिसण्यामुळे, वावरण्यामुळे वागण्यामुळे, बोलण्यामुळे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक - २६/०१/२०२६ नवी सांगवी प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित,द न्यू मिलेनियम इंग्लिश…
*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारीला विशेष सभा* *स्थायी समितीसह विविध…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- २०/१/२०२६, नवी सांगवी प्रतिभा महिला प्रतिष्ठान, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ जानेवारी : राज्यातील महापालिका निवडणुका झाल्या आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष…