Google Ad
Uncategorized

नवी सांगवीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य – “स्मार्ट सिटी”चा दावा कितपत खरा? नागरिक रस्त्यावरच टाकतायेत कचरा*

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 ऑगस्ट 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या *प्रभाग क्रमांक 31 – नवी सांगवी* परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, स्वच्छ भारत आणि स्मार्ट सिटीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या भागातील मुख्य रस्ते, सोसायटीच्या बाहेर आणि मोकळ्या जागांमध्ये नागरिकांकडूनच कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. यामध्ये शनी मारुती मंदिर , ढोरे फार्म, सिव्हिल हॉस्पिटल,लुम्बिनी बुद्ध विहार च्या समोर या भागात रस्त्यावर कडेला दररोज कचरा आढळून येतो . सकाळी आणि संध्याकाळी कचरा गाडी वेळेवर न आल्याने नागरिक कामावर असतात त्यामुळे रहिवासी पर्याय म्हणून रस्त्यावर कचरा टाकत आहेत.

Google Ad

महानगरपालिका आरोग्य विभागाकडून दररोज याठिकाणचा कचरा उचलला जातो, अनेक नागरिकांना दंड ही मारण्यात आला, अनेकांना समज देण्यात आली तरी ही नागरिक कॅरीबॅग मधून कामावर जातांना कचरा टाकताना दिसतात.

*स्थानिकांची व्यथा*
>आम्ही खरंच स्मार्ट सिटीत राहतो का?? “स्मार्ट सिटी म्हणतो पण इथे पाय ठेवायला जागा नाही. कचऱ्यामुळे डास, कुत्रे आणि घाणीचे साम्राज्य वाढले आहे. PCMC ने कचरा उचलण्याची वेळ निश्चित करावी.”

*▶️समस्या काय?*

1. *कचरा गाडीची अनियमित वेळ* – ठराविक वेळ नसल्याने कामावर जाणारे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात
2. नागरिकांमध्ये *जागरूकतेचा अभाव* – ओला-सुका कचरा वेगळा न करणे
3. *भटक्या कुत्र्यांचा प्रश्न* – कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली

*▶️PCMC कडे मागणी* :
नागरिकांनी PCMC आयुक्त आणि आरोग्य विभागाकडे तातडीने खालील मागण्या केल्या आहेत:
. प्रभाग 31 मध्ये दररोज 2 वेळा कचरा उचलणी
. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
. स्वच्छता मोहीम आणि जनजागृती अभियान

*PCMC हेल्पलाइन*: http://1800-103-0222 | *स्वच्छता तक्रार App*: PCMC Sarathi

“स्मार्ट सिटी” फक्त नावापुरती न राहता, नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!