Google Ad
Uncategorized

पुणे सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री भीषण अपघात, तळेगाव दाभाडेच्या ४ तरुणांचा मृत्यू; दोघे गंभीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 ऑगस्ट : सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला असून यात तळेगावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कार आयशर ट्रकला धडकून हा अपघात झालाय. अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातल्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. कारमध्ये अडकलेल्यांना दरवाजे कापून बाहेर काढण्यात आलं. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरूड आणि निखिल राऊत अशी आहेत.

Google Ad

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असताना कारवरील ताबा सुटून गाडी डिव्हायडरला धडकली. डिव्हायडर ओलांडून कार विरुद्ध दिशेच्या लेनवर गेली. त्यानंतर समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडक दिली. शिरवळ इथं हॉटेल शिवालयसमोर रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. महामार्ग पोलीसही घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!