Google Ad
Uncategorized

जनहिताला प्राधान्य देत आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या स्थानिक आमदार निधीतून ९ हजार लिटर क्षमतेचे चार पाण्याचे टँकर जनतेच्या सेवेसाठी सज्ज

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ एप्रिल) : जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा देऊन, तसेच राज्यात उन्हाळय़ाची तीव्रता वाढत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेण्याकरिता चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्णत्वाला नेत असताना सर्वसामान्य माणसाला पाणी हे मिळालेच पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी महानगरपालिकेच्या चार प्रभागात आपल्या स्थानिक आमदार निधीतून नऊ हजार लिटर क्षमतेचे चार पाण्याचे टँकर भेट दिले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना होणारा पिण्याच्या पाण्याचा त्रास आता मिटणार आहे.

Google Ad

त्याकरिता प्रभाग स्थरावर पाणी पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टँकर चालक पाणी पुरवठा करणार आहेत, त्याकरिता ७५०७४१११११ हा हेल्पलाईन नंबरही उपलब्ध करून दिला आहे, तरी नागरिकांनी पाणी जपून वापरून याचा गरजेनुसार लाभ घ्यावा असे आवाहन ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या वतीने शहरातील नागरिकांना करण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!