महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून लेखी समस्या मांडता यावी याकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबईमार्फत १५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला येथे सकाळी १० वाजता पुणे शहरासाठी १५ एप्रिल रोजी तर पुणे ग्रामीणसाठी १६ एप्रिल रोजी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी येथे १७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वा. जनसुनावणी घेण्यात येणार आहे.
या सुनावणीकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून पीडित महिला, तक्रारदार महिलांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…
गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…