Categories: Uncategorized

लक्ष्मणभाऊंच्या पावलावर पाऊल टाकत आणि त्यांचे आशिर्वाद सोबत घेत मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करणार : संजोग वाघिरे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ मार्च) : लक्ष्मणभाऊंनी चिंचवड मतदार संघाचा चेहरामोहरा बदलला, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आणि त्यांचे आशिर्वाद सोबत घेत मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार आहे, असा विश्वास संजोग वाघेरे पाटील यांनी पिंगळे गुरव येथे बोलताना व्यक्त केला. संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपळे गुरव येथील स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळास आज रविवारी (दि.१७) भेट दिली. स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून, नतमस्तक होत अभिवादन केले. त्यांचे आशिर्वाद घेऊन त्यांनी आपल्या प्रचारास सुरूवात केली.

संजोग वाघेरे पाटील आणि लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप या दोघांची घटमैत्री होती. राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून पिंपरी चिंचवड शहरात त्यांना ओळखले जात होते. राजकीय भूमिका बदलत गेल्या. तरी देखील राजकारणापलिकडील त्यांची मैत्री कायम होती.‌ कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रमांना ते दोघे एकत्र असत. संजोग वाघिरे यांचे वडील भिकू वाघेरे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित कार्यक्रमास लक्ष्मण भाऊ पिंपरीगावात आवर्जून उपस्थित राहत.

संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपळे गुरव येथील स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळास भेट देत पिंगळे गुरव, नवी सांगावी भागाचा दौरा केला, त्यावेळी त्यांच्या समवेत विजूअण्णा जगताप, संदेश नवले, अमित सुहासे, शांताराम वाघेरे, संतोष देवकर, अनिताताई तुतारे, मोहन बारटक्के, अमोल नाणेकर, ओंकार पवळे, अक्षय जगताप, महेश वाघेरे, रंगनाथ कापसे, सागर वाघेरे, प्रशांत वाघेरे, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▶️लोकनेते लक्ष्मणभाऊंच्या कार्याचा बारणेंना विसर :

मावळ लोकसभेसाठी बारणे यांना तिसऱ्यांदा तिकीट देणार? की ही जागा भाजपा किंवा राष्ट्रवादीला सोडणार याबाबत देखील चर्चा सुरू असताना श्रीरंग बारणे यांनी ‘संसदरत्न आप्पा’ या पुस्तकाचे नुकतंच प्रकाशन केलं आणि ‘संसदरत्न श्रीरंग आप्पा’ वादाच्या भोवऱ्यात सापडले. गेले एक दोन दिवसापूर्वी श्रीरंग बारणे यांनी “संसदरत्न श्रीरंग आप्पा” या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे, प्रकाशन केलेल्या पुस्तकांमध्ये विविध क्षेत्रातील विविध भागातील अनेक मंडळींचे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणणे मांडले आहेत, परंतु खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांचा उल्लेख केलेला नाही यावरून असे लक्षात येते की खासदार श्रीरंग बारणे यांना पिंपरी चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व त्यांच्या परिवाराचा विसर पडलेला आहे, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना याची फार मोठी किंमत मोजावी लागणार एवढे मात्र नक्की …

दरम्यान, स्व. लक्ष्मण जगताप समर्थक, सुनील शेळके अर्थात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाळा भेगडे अर्थात भाजपा हे घटक पक्ष नाराज असतील तर बारणेंना मोठा झटका बसू शकतो, त्याचा परिणाम थेट लोकसभा निवडणुकीवर होण्याची दाट चिन्हे मावळ मतदारसंघात दिसू लागली आहे. बारणेंचे काम आम्ही का करायचे ? असा सवालही लक्ष्मण भाऊंच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना करत आहेत, याचा प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांना चांगलाच फायदा होईल.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

1 hour ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

3 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

3 days ago