Categories: Uncategorized

अखेर बिगुल वाजले ! महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर; पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका होणार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०४ नोव्हेंबर :- राज्यात गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. यावेळी नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली.

त्यानुसार, २ डिसेंबर २०२५ मतदान होणार असून ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. 246 नगरपरिषदा, ४२ नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळं आता राज्यात सगळीकडं राजकीय धुरळा पाहायला मिळणार आहे.

▶️असा असेल कार्यक्रम?

1) नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५

2) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५

3) नामनिर्देशनपत्राची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५

4) नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपिल नसलेल्या) – २१ नोव्हेंबर २०२५

5) नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपिल असलेल्या) – २५ नोव्हेंबर २०२५

6) निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी – २६ नोव्हेंबर २०२५

7) मतदानाचा दिवस – २ डिसेंबर २०२५

8) मतमोजणीचा दिवस – ३ डिसेंबर २०२५

9) शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५

▶️उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा किती?

उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामध्ये ‘अ’ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी १५ लाख रुपये, सदस्यपदासाठी ५ लाख रुपये. तर ‘ब’ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ११ लाख २५ हजार रुपये आणि सदस्यपदासाठी ३ लाख ५० हजार रुपये. ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ७ लाख ५० हजार रुपये तर सदस्यपदासाठी २ लाख ५० हजार रुपये इतकी खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसंच नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ६ लाख रुपये तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार अशी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

▶️मतदारांना किती मत द्यावी लागणार

नगपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीनं होणार आहे. यामध्ये एका प्रभागात सर्वसाधारणपणे २ जागा असतात. पण जर आकडा विषम असेल तर एका प्रभागात ३ जागा असतात. त्यामुळं इथं मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागेल. याशिवाय नगरपरिषदेचा एक अध्यक्ष असेल त्यासाठी देखील मतदान करावा लागेल. नगरपंचायतमध्ये १ सदस्य आणि १ अध्यक्ष असल्यानं मतदारांना इथं दोन मत द्यावी लागतील.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतच्या भव्य-दिव्य वास्तूची प्रत्यक्ष भाजप पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन…

16 hours ago

शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम .. काव्यशायराना’तून समतेचा संदेश; वसीम बरेलवी यांच्या शायरीने रंगली मैफल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ एप्रिल २०२६ – शब्द, सुर आणि विचार यांचा त्रिवेणी संगम…

4 days ago

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर – सभापती रविना आंगोळकर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ एप्रिल २०२६ :* बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा…

5 days ago

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

1 week ago