महाराष्ट्र14 न्यूज,दि.२६ नोव्हेंबर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने थेट 200चा टप्पा पार करत निर्विवाद बहुमत मिळविले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा तसेच शिवसेनेकडून दावे करण्यात येत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
तथापि, मुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड करायची, याचा निर्णय राजधानी दिल्लीत भाजपाचे पक्षश्रेष्ठी करणार आहेत. कारण, या निवडणुकीत भाजपाने 132 जागांचा विक्रमी आकडा गाठला आहे. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपाने 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019मध्ये भाजपाचे 105 जण निवडून आले हेते, पण यावेळी भाजपाने 132 जागा जिंकत मोदी लाटेचा रेकॉर्डही मोडला आहे. हे सारे यश देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळेच मिळाल्याने ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरतात, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. 178 आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची घोषणा होण्यास विलंब होत असल्याने फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांसह भाजपाला पाठिंबा देणार्या अपक्ष आमदारांनी फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.
मात्र, ज्यांच्या जास्त जागा त्यांना मुख्यमंत्रीपद या सूत्राप्रमाणे भाजपाकडे असेल आणि त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नचा दाखला दिला आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार आणि भाजपाने एकत्रितरित्या विधानसभा निवडणूक लढली होती. मात्र, जदयूला कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. हाच बिहार पॅटर्न राज्यातही लागू करून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव काळात पिंपरी…