Categories: Editor Choice

ती आली, तिनं पाहिलं,अन तिनं जिंकलं … पिंपळे गुरवमध्ये नगरसेवकांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनी घेतला ‘हॅप्पी स्ट्रीट’ चा आनंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० फेब्रुवारी) : ती आली, तिनं पाहिलं,अन तिनं जिंकलं … पिंपळे गुरवमध्ये नगरसेवकांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनी घेतला ‘हॅप्पी स्ट्रीट’ चा आनंद! औचित्य होत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या संक्पनेतून आयोजित केलेल्या कला- क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे…

रविवारी म्हटलं की जरा काही वेगळं आणि हटके परंतु ते जर सर्वांच्या बरोबर एन्जॉय करायला मिळालं तर कोणाला नकोय, असाच काही हटके कार्यक्रम करण्याचे सांगवी पिंपळे गुरव मधील नागगसेवकांनी ठरवलं आणि आज रविवारी पहाटेच कृष्णा चौक ते काटे पुरम चौकाकडे नागरिकांचे अक्षरशः लोंढेचे लोंढे दिसायला लागले, निळू फुले नाट्यगृहा समोर गर्दीचा महापूर दिसू लागला अन ती वेळ झाली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची स्टेजवर एन्ट्री झाली.

 

गेम होस्ट आर जे अक्षय आणि टीम डान्स फ्लोअर स्टुडिओ साऊंड सिस्टमने ठेका धरला आणि संपूर्ण तरुणाईन गाण्याचा ठेका धरत कार्यक्रमात रंगात आणली, त्यात नगरसेवकही कुठे कमी पडले नाहीत, त्यांची पावलही अलगद या तालावर थिरकली, अन त्यांनीही या संगीताचा आनंद घेत नृत्य केले.

 

रस्ते गर्दीने अक्षरशः फुलले होते, काही जेष्ठ नागरिक घराच्या गच्चीतून आनंद घेत होते, पाहावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती, अनेक प्रकारच्या खेळांचे प्रकार या हॅप्पी स्ट्रीट वर दिसून येत होते, लहान मुलांपासून ते महिला,पुरुष यांनी यात सहभाग घेतल्याचे दिसून येत होते. यात स्केटिंग, मल्ल खांब ,फुगडी , ढोल, झुंबा डान्स, गेम होस्ट, बॅलन्स, टॅटू, केक कटिंग,योग असे मजेदार कार्यक्रमांचा मनमुरादपणे आनंद नागरिक घेताना दिसत होते.

कार्यक्रमाचे नियोजन संयोजकांनी अगदी नाविन्यपूर्ण असे केले होते. त्त्यामुळे कोणतीही कमतरता जाणवली नाही. रस्त्यावर दुतर्फा झालर, कमानी, रांगोळ्या आणि नियोजन करण्यासाठी ठीक ठिकाणी बोउन्सर ठेवण्यात आले होते. सकाळी बरोबर सात वाजता शहराच्या महापौर माई ढोरे, सौ. अश्विनीताई जगताप आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत नागरिकांना हात उंचावून कार्यक्रमाला सुरुवात झाली, यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची उपसथितीलक्षणिय ठरली कार्य्रमाकरीता आलेले नागरिक आणि बाल चमुना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बरोरीने सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. बरोबर नऊ वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago