Categories: Editor Choice

तनिष प्राइड हाऊसिंग सोसायटी मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

महाराषट्रा 14 न्यूज, दि.19फेब्रुारी)   पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील च-र्होली परिसरातील तनिष प्राइड हाऊसिंग सोसायटी मध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सकाळी चर्होलीतून भोसरी गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासुन लहान मुले,मुली व इतर मावळ्यांनी मशाल ज्योत धावत सोसायटी पर्यंत आणली ज्योत मध्ये निरंजन म्हस्के,वेदांत वायकर,महेश नाक्ती, विवेक काकडे,अनुज काकडे,आदित्य ईष्टे,वरद वायकर,श्रवण मातुळकर, शाश्वत ताले,तनिश रासकर,यद्नेश लोहार,अवदुत वायभट,वरदराज पानसकर, मद्रेवार सर, थोटे सर, लहान मुले-मुली ज्येष्ठ सभासद या सर्वांनी सहभाग घेतला असून सायंकाळी लहान मुलांनी विविध कला गुणदर्शनाचे सादरीकरण केले

त्यामध्ये पौराणिक पोवाडा, महाराजां बद्दल वकृत्व, पथनाट्य व पारंपारिक वेशभूषेत मध्ये नृत्याचे सादरीकरण केले कार्यक्रमामध्ये सोसायटीतील सर्व मुलांनी महिलांनी तसेच जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन तनिष प्राईड कमिटीतील चंद्रकांत कुंभार, शंकर नाक्ती, नितिन ईष्टे, किशोर पानसकर, रणजित तवले,गुणवंत चौधरी यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल चावरिया यांनी केले असून सोसायटीचे चेअरमन श्री शिवशंकर ताले यांनी सर्वांचे आभार मानले, सोसायटीमध्ये कोरोणा काळानंतर तब्बल दोन वर्षानंतर आजचा कार्यक्रम घेऊन सोसायटी मध्ये आनंदाचे वातावरण पुन्हा एकदा दिसले..

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago