Categories: Editor Choice

शरद पवार यांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 20 फेब्रुारी) : ज्येष्ठ नेते, खासदार आदरणीय Sharad Pawar यांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा,असं आवाहन यावेळी केलं. शासकीय इमारती जनतेनं दिलेल्या कराच्या पैशातून उभ्या राहतात, त्याला जनतेच्या घामाचा सुगंध असतो.

त्यामुळे इमारतीत काम करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावं आणि इथे येणाऱ्या व्यक्तीच्या करातून आपल्याला पगार मिळतो याची जाणीव ठेवावी. काम करताना लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करण्याची आवश्यकता आहे. विकासाची कामं करताना गोरगरीबांनाही त्याचा उपयोग होईल याची दक्षता घेण्यात येईल. पंचायत समितीच्या इमारतीत बँकेसह इतरही सुविधा देण्यात येतील. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतून दूरदृष्य प्रणालीची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे कामकाज गतिमान होण्यास मदत होईल.

ही इमारत राज्य आणि देशातील पंचायत समितीची भव्य इमारत असावी. इमारतीच्या माध्यमातून चांगलं काम उभं रहावं. पंचायत समितीच्या कामकाजाचं वेगळं महत्त्व आहे. लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगलं कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यामुळे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था रुजली. याच माध्यमातून सत्ता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम झालं. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची ही परंपरा यशस्वी झाली.

लोकशाही व्यवस्थेचं बळकटीकरण होऊन लोकशाही मजबूत झाली. बारामती शहरात अनेक कार्यालये,वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुंदर इमारती उभ्या झाल्या आहेत. कवी मोरोपंतांच्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समितीची सुविधायुक्त वास्तू, अद्ययावत क्रीडा संकुल, पाणी पुरवठा योजना या सुविधा जनतेसाठी निर्माण करण्यात येत आहेत. बारामती बसस्थानकाचं काम पूर्ण होत आहे. हे बसस्थानक राज्यातील प्रमुख स्थानकांत गणलं जाईल. बारामती हे शिक्षणाचे ‘हब’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास मला आहे. पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर करण्यात येईल.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

21 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago