Google Ad
Uncategorized

असंही वेड असावं … समाजसेवेचा वसा घेतलेले ‘कैलास बनसोडे’ देतायेत … दापोडीतील गोरगरिबांना विविध उपक्रमांतुन मदतीचा हात!

महाराष्ट्र 14 न्यूज : कधीकधी अशी काही छायाचित्रे सोशल मीडियावर समोर येतात जी पाहून आपले मन आनंदित होते आणि आपल्याला वाटतं की अजून तरी माणुसकी जिवंत आहे. अशीच काही छायाचित्रे आहेत जी आपल्याला माणुसकीची शिकवण देतात, त्यातीलच एक नाव म्हणजे दापोडीतील ‘कैलास बनसोडे’ …

माणूस तसा सर्वसामान्य साधासुधा, पण वेड म्हणतात ना ते असं असतं … कोरोनाच्या संकटकाळात सर्व सामान्य कुटूंबातील गरिबांची परवड झाली. यात कष्टकरी, मजूर, लघुउद्योजक , हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना काम नसल्याने आर्थिक झळ सोसावी लागली. हाताला काम नाही, घरात वयोवृद्ध अन्नपाण्यावाचून त्यांचे हाल होतायेत, हे एक सर्वसामान्य व्यक्तीमत्व असणाऱ्या आणि आपल्याही आयुष्यात दुःखाच्या झळा सोसणाऱ्या ‘कैलास बनसोडे’ या युवकाला पाहावल्या नाहीत. यात भरडलेल्या नागरिकांना आपल्या हातून काहीतरी दिलासा मिळावा असं त्यांना मनोमन वाटू लागले.

Google Ad

समाजसेवेचे वेड त्याला बसू देत न्हवतं… तनामनात लोकसेवेचे बाळकडू ओतप्रेत भरलेले असल्याने ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून दापोडी येथील महात्मा फुले नगर येथील गरीब गरजूंना जिवनावश्यक साहित्याचे वाटप कैलास बनसोडे यांनी केले . गेली पंधरा दिवसांपासून या परिसरात त्यांच्या वतीने दिलासा सप्ताह राबविण्यात येत आहे .

माणसाला जीवन जगण्याला अन्न आणि त्याचबरोबर कोरोनाच्या संकटात लागणारा प्राणवायू काय असतो? आता याचे महत्त्व सर्वांना कळाले आहे . कोरोनाने अनेकजणांच्या कुटुंबातील सदस्य जिवलग नातेवाईक हिरावून घेतले. या प्राण वायूचे महत्त्व काय आहे? हे समजण्यासाठी झोपडपट्टी मधून मी सावित्रीबाई फुले बोलतेय या एकपात्री नाटकाद्वारे संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वत : ची व इतरांची काळजी घेण्याबाबत मास्क , सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळून कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकले पाहीजे असा सामाजिक संदेश याद्वारे देत उषाताई कांबळे नागरिकांचे प्रबोधन करण्याचा कार्यक्रम कैलास बनसोडे यांनी हाती घेतला .

याबाबत ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे म्हणाले , झोपडपट्टीतील जिवनाच्या व्यथा व वेदना मी अनुभवलेल्या आहेत.मी मुळचा सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावचा गेली चाळीस वर्षांपूर्वी आई वडील उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात पिंपरी – चिंचवड उद्योग नगरीत आले . त्यांनी बांधकाम मजूर म्हणून काम करत कुटूंब सांभाळले . आम्हाला घडवले.त्यामुळे झोपडपट्टीतील व्यथा व वेदनांची मला जाणीव आहे .

त्यामुळेच त्यांनी आपल्या कडे राहत असलेल्या भाडेकरूंना कोरोनाच्या संकट काळात भाडे देऊ नका, आपले काम चालू झाल्यानंतर मला भाडे चालू करा असे सांगून या काळात भाडेकरूंना दिलासा दिला, त्यामुळे त्यांनी केलेल्या या खऱ्याखुऱ्या समाजसेवेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. आणि त्यांच्या या स्वभावाने अनेकजण त्यांना आपल्या सेवकार्यात उपक्रमात मदतीचा हात देतात. यात प्रमिलाताई इनामदार , राजश्री पोटे , ज्युलियाताई शितलानी , नुतन सोनवणे , सुप्रिया काटे, बाळासाहेब भोसले , अल्फ्रेड जोसेफ , लॉरेन्स जाधव , प्रदीप रॉय , राजेश हातेकर, रमेश सोलंकी आदींचे योगदान खूप मोलाचे आहे असे कैलास बनसोडे सांगतात.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!