Google Ad
Uncategorized

वय वर्ष ३० ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना १९ जून रोजी ‘कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस या केंद्रांवर मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .१८ जून २०२१) : उद्या दि .१९ जून २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ वय ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०८ कोविड -१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

▶️सदर वय वर्षे ३० ते ४४ वयोगटामधील कोविन अॅप वर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या ५० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा – या ५० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि . १ ९ / ०६ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ वय ४५ वर्षा पुढील लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०३ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच उद्या दि .१ ९ / ०६ / २०२१ रोजी कोव्हॉक्सीन ‘ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थीना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील ०३ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा , व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले | -20 किंवा DS – 160 From ( Admission confirmation latter and I – 20 or DS – 160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc. ) , मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा – या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकिओ ऑलंपिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार दि . १ ९ जून २०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी -१० ते ०५ या वेळेत करण्यात येणार आहे .

तसेच उद्या दि .१ ९ / ०६ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या यादीमधील ४४ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .१९ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!