महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ५ मार्च २०२५ : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे जापनीज मेंदूज्वर (Japanese Encephalitis – JE) प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. १ ते १५ वयोगटातील बालकांसाठी १ मार्च २०२५ पासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत अवघ्या तीन दिवसांत ३५ हजारांहून अधिक मुलांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही मोहीम शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विशेष लसीकरण शिबिरांमध्ये प्रभावीपणे राबविली जात आहे. शहरातील सर्व मुलांचे शालेय व समाजस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. पालक या मोहिमेस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत.
या मोहिमेअंतर्गत दि. १ मार्च २०२५ रोजी, शहरातील पिंपळे गुरव दवाखान्या अंतर्गत, creative Angle Junior स्कूल येथे JE लसीकरण सत्र येथे मा. सहाय्यक आरोग्य अधिकारी- डॉ अंजली ढोणे यांनी visit केली. प्रसंगी नोडल अधिकारी डॉ वैशाली भामरे व सि एएनएम बांगर सिस्टर, मेटे सिस्टर, एएनएम व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. सत्राचे नियोजन डॉ. जयश्री शेलार व त्यांच्या टीम ने केले.
…..
लसीकरण मोहिमेचा यशस्वी टप्पा :-
संपूर्ण शहरात राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत ४ मार्च २०२५ पर्यंत ३५ हजारांहून अधिक बालकांचे जेई लसीकरण करण्यात आले आहे.
रुग्णालयाचे नाव – लसीकरण झालेल्या बालकांची संख्या
आकुर्डी रुग्णालय – ६ हजार २८९
भोसरी रुग्णालय – ५ हजार ३०४
जिजामाता रुग्णालय – ३ हजार २३६
सांगवी रुग्णालय – ४ हजार ५३०
तालेरा रुग्णालय – ४ हजार ७२४
थेरगाव रुग्णालय – २ हजार८०६
यमुनानगर रुग्णालय – ५ हजार ७७८
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय – २ हजार ३६३
————
‘जेई’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम केवळ एक लसीकरण उपक्रम नसून आपल्या मुलांच्या उज्ज्वल आणि आरोग्यदायी भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक बालकाला लसीकरण मिळावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने नियोजन केले आहे. पालकांनी देखील या मोहिमेस सहकार्य करून आपल्या पाल्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा. या मोहिमे अंतर्गत शहरातील सर्व मुलांचे शालेयस्तरावर मोफत लसीकरण केले जात आहे. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी आपल्या घरातील १ ते १५ वयोगटातील पाल्याला ही लस देऊन घ्यावी.
–शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका
जापनीज मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार असून तो प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. हा आजार मेंदूच्या मज्जातंतूंवर गंभीर परिणाम करू शकतो. देशातील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते. या आजारातून ३०-४० टक्के बरे झालेल्या रुग्णांमध्ये आजीवन मज्जासंस्थेशी संबंधित अपंगत्व दिसून येते. त्यामुळे या जीवघेण्या आजारावरील प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा व मुलांना जापनीज मेंदूज्वर प्रतिबंधक लस द्यावी.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका
…..
जापनीज मेंदूज्वर हा एक गंभीर आजार असून, ताप, सतत उलट्या होणे अशी लक्षणे यामध्ये दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे या आजारावरील लसीकरण हा एकमात्र सुरक्षित पर्याय आहे. ही लस ९ महिन्यांच्या वयात घेतली असली तरी सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत ती पुन्हा घेणे आवश्यक आहे. जेणेकरून रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आजाराचा प्रसार रोखता येईल. पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…
शहरातील दहा पत्रकारांनी पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले पत्रकार हा लोकशाहीतील चौथा स्तंभ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१ मार्च - राज्यातील सर्व मुलींना शासनातर्फे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ फेब्रुवारी : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य…
॥ रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा ॥ महाराष्ट्र 14 न्यूज, दि २५ फेब्रुवारी : महाराष्ट्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…