भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी महिला मतदारांचा एल्गार; एक लाखांचे मताधिक्य देण्याचे वचन
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी काळेवाडी परिसरात मतदारांशी संवाद साधला. काळेवाडीच्या विविध भागात कोपरा सभा घेतल्या. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी अश्विनी जगताप यांचा एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या नागरिकांशी घरोघरी जाऊन संपर्क साधत आहेत. विशेषतः त्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे मतदारसंघात अश्विनी जगताप आणि महिला मतदारांमध्ये जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. अश्विनी जगताप पतीच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून करत असलेल्या प्रचारामुळे महिला मतदारांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या जेथे जातील तेथे त्यांना महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
सोमवारी अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी काळेवाडी भागात नागरिकांशी संवाद साधला. विविध भागात कोपरा सभा घेऊन निवडणुकीत विजयी करण्याचे महिला मतदारांना भावनिक आवाहन केले. महिलांनीही अश्विनीताई तुम्हाला आम्ही एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करू, असे वचन दिले.
यावेळी माजी उपमहापौर नानी घुले, माजी नगरसेविका नीता पाडाळे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, पुणे नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, माजी स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर, कैलास सानप यांच्यासह भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…