Categories: Editor Choice

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात-निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ (रॅन्डमायझेशन) नंतरची यादी तसेच मतदानासाठी मतदानयंत्र तयार करताना (कमिशनिंग) अकार्यान्वित झाल्यामुळे बदलण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट) यादीबाबत उमेदवारांना माहिती देण्यात आली नाही, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले आहे, या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया निःपक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात पार पाडण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

श्री. पवार यांनी सांगितले, मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ जिल्हास्तरावर पार पडल्यानंतर ८ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत आणि उमेदवार तसेच प्रतिनिधी यांच्या समक्ष मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील बापुजी बुवा सभागृहात पार पडली. याबाबत सर्व उमेदवारांना उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले होते.

मतदान यंत्रांच्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेवेळी उपस्थित उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ करण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या यादीची प्रत त्याच दिवशी उपलब्ध करुन देण्यात आली होती. इतर उमेदवारांना सदर यादी ई- मेलद्वारे पाठविण्यात आली.

त्यानंतर ९ ते ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विधानसभा मतदारसंघासाठी मतदानासाठी मतदानयंत्र (कमिशनींग) तयार करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यावेळी अकार्यान्वित झालेल्या व बदलण्यात आलेल्या मतदान यंत्राची यादीही त्यावेळी उपस्थित असलेले उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना समक्ष देण्यात आली. उर्वरित उमेदवारांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आली.

भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनांनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया निःपक्षपातीपणे, पारदर्शक वातावरणात सुरू असून या प्रक्रियेबाबतची आवश्यक माहिती सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना व्यक्तीशः तसेच दूरध्वनी, ई-मेल, व्हॉट्स अॅपद्वारे देण्यात येत आहे, अशीही माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago