Google Ad
Uncategorized

दरोडा टाकणाऱ्या टोळीस अटक करून , त्यांचेकडून १४ पिस्टल व ०८ जिवंत काडतुसे असा एकूण किं . रू . ०४,९०,५०० / – रूचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जानेवारी) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सांगवी , चाकण या पोलीस ठाणेचे हद्दीत अग्नि शस्त्राचा वापर करून खुन झालेबाबत गुन्हे नोंद झाल्याने विनापरवाना अग्निशस्त्रे बाळगणारे , विक्री करणारे यांचेवर कठोर कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड कृष्ण प्रकाश यांनी गुन्हे शाखेतील पथक व शाखांना सुचना दिल्या होत्या . त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , पोलीस उप निरीक्षक श्री . मंगेश भांगे व दरोडा विरोधी विरोधी पथकाचे अंमलदार असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात अग्निशस्त्रे बाळगणे प्रकरणी यापुर्वी अटक केलेले रेकॉर्डवरील आरोपीची माहिती प्राप्त करून , त्यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून , पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील त्यांचे आस्तित्वाबाबत तांत्रिक विश्लेषन करून , गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत होते.

यावेळी पोलीस नाईक सागर शेडगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , वडमुखवाडी , चन्होली , पुणे या परिसरात दोन मोपेडवर पाच इसम हे विनाकारण फिरत असुन , ते सदर परिसरातील राहीवासी नसुन , त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत अशी माहिती प्राप्त झाली . मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . उत्तम तांगडे यांनी पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे यांची एक टिम तयार करून त्यांना कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

Google Ad

त्याप्रमाणे या टिमने या ठिकाणी सापळा रचुन मोठ्या शिताफिने १ ) आकाश अनिल मिसाळ , वय २१ वर्षे , रा . प्रेम विला , रेणुका माता मंदिरा समोर , इंद्रायणीनगर , भोसरी , पुणे २ ) रूपेश सुरेश पाटील , वय ३० वर्षे , रा . मु.पो. वडगांव बुद्रक , ता . चोपडा , जि . जळगाव ३ ) ऋतिक दिलीप तापकिर , वय २६ वर्षे , रा . पांडुरंग हाईटस् , मुक्ता रेसीडन्सी समोर , सुतारवाडी लास्ट बस स्टॉप , पाषाण , पुणे यांना दिनांक ०३/०१/२०२२ रोजी २२:४५ वा वरिल स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले व दोन इसम हे पोलीस आल्याची चाहुल लागताच एका मोपेड वरून पसार झाले .

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांचे अंगझडती मध्ये कि . रू . १,५१,५०० / – चे मोपेड , दोन पिस्टल , दोन जिवंत राऊंड , तीन मोबाईल फोन , मिरची पुड व नॉयलॉन दोरी असा माल मिळुन आल्याने , त्यांच्याकडे चौकशी करता ते हत्यारानिशी कृष्णाई पेट्रोल पंप , हॉटेल जाळीचा मळा समोर , अलंकापुरम रोड , वडमुखवाडी , चरोली, पुणे येथे दरोडा टाकण्याचे उद्देशाने आल्याचे समजल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल ‘ करण्यात आला .

नमुद आरोपीतांची दिनांक १७/०१/२०२२ रोजी पर्यंतची १४ दिवस पोलीस कोठडीची रिमांड घेवुन , त्यांच्याकडे पोलीस कोठडी मुदतीत तपास करता , आरोपी रूपेश पाटील व ऋतिक तपाकीर यांचेकडुन ते राहत असलेल्या फ्लॅट मधुन ०६ गावठी कट्टे ( पिस्टल ) व जिवंत राऊंड , तसेच आरोपी आकाश मिसाळ याचे इंद्रायणीनगर येथील राहते घरातुन ०४ गावठी कट्टे ( पिस्टल ) व जिवंत राऊंड असे किं.रू. २,१९ , ००० / – रू चे १० गावठी कट्टे ( पिस्टल ) व ०४ जिवंत काडतुसे असा पोलीस कस्टडी दरम्यान मुद्देमाल जप्त करण्यांत आला आहे . नमुद आरोपीतांनी सदरची अग्निशस्त्रे ही मध्यप्रदेश येथुन आणले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून , सध्या गुन्हयाचा तपास सुरू आहे .

तसेच तपासादरम्यान आरोपी रुपेश पाटील याने अग्निशस्त्रे विक्री केलेल्या इसम नामे अजित ऊर्फ विकी रामलाल गुप्ता , वय -२८ वर्षे , रा . भोसरी यास अटक करुन त्याचे वर दिघी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचे कडुन ०२ अग्निशस्त्रे व ०१ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे . आरोपी रूपेश पाटील व आकाश मिसाळ हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन , रूपेश पाटील व त्याचे साथीदार यांचेकडुन यापुर्वी देखील २४ अग्निशस्त्रे व १६ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती . आरोपी रूपेश पाटील हा अग्निशस्त्रांची तस्करी करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे . त्याबाबत त्याचेवर यापुर्वी गुन्हे दाखल आहेत . तसेच तो नेहमी वेगवेगळया साथीदारांसह सदरचे गुन्हे करीत आहे .

आरोपी रूपेश पाटील हा भोसरी पोलीस स्टेशन मधील अनेक गुन्हयातील  आरोपी असुन त्यावर खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत . आरोपी रूपेश पाटील याचेवर दाखल असलेले गुन्हे १ ) चिंचवड पोलीस ठाणे गुरनं २१४/२०११ भादवि ३ ९९ , ४०२ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , महा . पो . अधि . कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ २ ) देहुरोड पोलीस ठाणे गुरनं ११ ९ / २०१४ भादवि ३०२ , ३४ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) महा . पो . अधि . कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ ३ ) देहुरोड पोलीस ठाणे गुरनं २२७/२०१६ भादवि ३ ९ ५ , ३ ९ ७ , ३ ९ ४ , १२० ( ब ) ४ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं २ ९ १ / २०१६ आर्म अॅक्ट ३ ( २५ ) महा . पो . अधि . कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ ५ ) चिंचवड पोलीस ठाणे गुरनं २६८ / २०१६ महा . पो . अधि . कलम १४२ ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ आरोपी आकाश मिसाळ याचेवर दाखल असलेला गुन्हा १ ) भोसरी पोलीस ठाणे गुरनं ९ ४ / २०१५ भादवि ३२४ , ५०४ , ५०६ , ३४ सदरची कारवाई पिंपरी – चिंचवडचे मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश , मा . अपर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे , मा . पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) , डॉ . काकासाहेब डोळे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे १ श्री . पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे , पोलीस उप निरीक्षक श्री . मंगेश भांगे , तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे , उमेश पुलगम , नितीन लोखंडे , आशिष बनकर , सागर शेडगे , गणेश कोकणे , राजेश कौशल्ये , राहुल खारगे , विक्रांत गायकवाड , राजेंद्र शिंदे , औदुंबर रोंगे , गोविंद सुपे , नागेश माळी , पोहवा / शेटे यांचे पथकाने केली आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!